'दस नंबरी' बाप बेटे गजाआड...

बनावट एन. ए. ऑर्डर आणि शासकीय दस्तावेज तयार करुन नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणारी टोळी उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या टोळीतील एका बिल्डर बाप-बेट्यासह चार जणांना अटक झाली आहे. या भामट्यांनी सुमारे 30 ते 40 अनधिकृत इमारती बांधून सदनिकांची विक्री केल्याचं उघड झालंय.

Updated: May 21, 2012, 11:31 AM IST

www.24taas.com, उल्हासनगर

बनावट एन. ए. ऑर्डर आणि शासकीय दस्तावेज तयार करुन नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणारी टोळी उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या टोळीतील एका बिल्डर बाप-बेट्यासह चार जणांना अटक झाली आहे. या  भामट्यांनी सुमारे 30 ते 40 अनधिकृत इमारती बांधून सदनिकांची विक्री केल्याचं उघड झालंय.

डोंबिवली शहराजवळ असणाऱ्या नांदिवली, भोपर, दवडी, आजदे, घोलवली आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावांमध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरु असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार तपास करुन पोलिसांनी बिल्डर मृत्युंजय सिंग त्याचा मुलगा विशाल सिंग, इस्टेट एजंट सुनील गावडे, सुनील बोढारे, सत्यवान कदम, अजय कोलते यांना अटक केलीय. तर अमितकुमार सिंग आणि समीर विरानी हे संशयीत आरोपी फरार आहेत.

सुनील गावडे हा या टोळीचा मास्टरमाइंड आहे. जुने एन. ए. दाखले स्कॅन करुन त्यावर जमिनीचे सर्व्हे नंबर टाकले जायचे. त्यावर अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के मारले जायचे. अशा प्रकारे बनावट कागदपत्रकांद्वारे या टोळीनं 30 ते 40 इमारती बांधून सदनिकांची विक्री केली. खोट्या पावत्या तयार करुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला. सामान्य नागरिकांचीही फसवणूक केली.

विशेष म्हणजे या सर्व सदनिकांवर बॅंकेने कर्ज मंजूर केले आहेत. अनेक बिल्डरांनी अशा बोगस एन. ए. ऑर्डरच्या आधारानं इमारती उभारल्याची माहिती पोलीस तपासात समोर येतेय. या गुन्ह्यामध्ये आर्किटेक्ट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

नागरिकांनी कागदपत्रकांची खात्री करुनच सदनिका विकत घाव्यात, अन्यथा स्वप्नातलं घर वास्तवात मनस्ताप देऊ शकतं.

व्हिडिओ पाहा :

[jwplayer mediaid="105376"]