मांडूळांची तस्करी पडली भारी...

ठाण्यात गुन्हे शाखेनं काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केलीय. त्याच्याकडून सुमारे साठ लाख किमतीचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आलेत.

Updated: Jul 6, 2012, 04:03 PM IST

www.24taas.com, ठाणे 

 

ठाण्यात गुन्हे शाखेनं काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केलीय. त्याच्याकडून सुमारे साठ लाख किंमतीचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आलेत.

 

ठाण्यातील खेवरा सर्कल येथे काही दुर्मिळ जातीचे मांडूळ सर्प विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट 5 चे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश गव्हाणे यांना मिळाली होती.त्यानुसार सापळा रचत महंमद शकील शेख याला अटक करण्यात आलीय.मांडूळ साप बाळगल्यानं बरकत होईल असे सांगून तो विक्री करायचा. या मांडुळांची बाजारातील किंमत 60 लाख रुपये एवढी आहे. या मागे मोठं रॅकेट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय.