ही शाळा की गुरांचा गोठा?

उमरखेड नगरपालिकेची तातारशा बाबा उर्दू शाळा... इथं शिकत असलेली मुलं नाही तर बांधलेली गुरं दिसतील... शाळेच्या परिसरातली ही दृश्यं पाहिल्यांनंतर याला गुरांचा गोठा का म्हणू नये, असा प्रश्न पडतो. हे कमी की काय, एकाच खोलीत दीडशे विद्यार्थी बसवले जातात. त्याच खोलीत पोषण आहारही शिजवला जातो. ना शौचालय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था... आणि अशाच परिस्थितीत विद्यार्थी इथं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

Updated: Jul 27, 2012, 11:32 AM IST

www.24taas.com, श्रीकांत राऊत, यवतमाळ

उमरखेड नगरपालिकेची तातारशा बाबा  उर्दू शाळा... इथं शिकत असलेली मुलं नाही तर बांधलेली गुरं दिसतील... शाळेच्या परिसरातली ही दृश्यं पाहिल्यांनंतर याला गुरांचा गोठा का म्हणू नये, असा प्रश्न पडतो.  हे कमी की काय, एकाच खोलीत दीडशे विद्यार्थी बसवले जातात. त्याच खोलीत पोषण आहारही शिजवला जातो. ना शौचालय ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था... आणि अशाच परिस्थितीत विद्यार्थी इथं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

‘विद्यालय की शिक्षालय’ या सदरात ‘झी २४ तास’ राज्यातल्या शाळांच्या दुरवस्थेचा आढावा घेतंय. यामध्ये उघड झालेला यवतमाळ जिल्ह्यातल्या उरखेडमधल्या नगरपालिकेच्या शाळेच्या दुरवस्थेचा हा पंचनामा… स्वातंत्र्यापूर्वीपासून असलेल्या या शाळेला अजूनही नगरपालिकेनं इमारत बांधून दिलेली नाही. पुरेसे शिक्षकही नाहीत. खेळासाठी साहित्य नाही, मैदान नाही. शहरात दुसरी उर्दू शाळा नसल्यानं पालकांनाही या शाळेशिवाय पर्याय नाही.  त्यामुळं ही शाळा विद्यार्थ्यांसाठी विद्यालय नाही तर शिक्षालय ठरत आहे.

सरकार एकीकडं मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची भाषा करत असताना दुसरीकडं शिक्षणाच्या सोई-सुविधांचं हे विदारक चित्र चिंता करायला लावणारं आहे.

.