मुख्यमंत्र्यांनी दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते सोलापुरात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाच्या उद्धाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी राज्यातल्या जनतेच्या विकासात राजकारण न आणण्याचा सल्ला सर्व राजकीय पक्षांना दिला आहे.

Updated: Jan 1, 2012, 09:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, सोलापूर

 

 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते सोलापुरात डॉ.  द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाच्या उद्धाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातल्या  जनतेच्या विकासात राजकारण न आणण्याचा सल्ला सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. राज्यातल्या  जनतेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभही त्यांनी केला. ही योजना शासनानं नुकतीच मंजूर केली. ही  योजना एक लाखाच्या आत उत्पन्न अणा-या नागरिकांसाठी आहे.