स्त्री भ्रूण हत्या प्रकरण; बीडमध्ये कारवाईचा धडाका

बीडमधल्या बार्शी नाका परिसरातल्या पुलाखालच्या नदी पात्रात दोन आणि काकाधीरा इथं एक अर्भकं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी क्रौर्याची किती परिसीमा गाठली हे पुन्हा एकदा उघड झालं. झी 24 तासनं शनिवारी दुपारी सर्वात आधी हा प्रकार उघड केला. त्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत कारवाईचे आदेश दिले. यानंतर लगेचच सानप हॉस्पिटलच्या डॉ. शिवाजी सानपसह तिघांना अटक करण्यात आलीए.

Updated: Jun 3, 2012, 09:20 AM IST

 www.24taas.com, बीड 

 

बीडमधल्या बार्शी नाका परिसरातल्या पुलाखालच्या नदी पात्रात दोन आणि काकाधीरा इथं एक अर्भकं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी क्रौर्याची किती परिसीमा गाठली हे पुन्हा एकदा उघड झालं. झी 24 तासनं शनिवारी दुपारी सर्वात आधी हा प्रकार उघड केला. त्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत कारवाईचे आदेश दिले. यानंतर लगेचच सानप हॉस्पिटलच्या डॉ. शिवाजी सानपसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

शनिवारी बीडमध्ये तीन स्त्री अर्भकं आढळून आली होती.  हा प्रकार झी 24 तासनं उचलून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू झालं. त्यात बीडमध्ये मान्यता रद्द झालेलं भगवान हॉस्पिटल मागच्या दारानं सर्रास सुरू असल्याचं सर्च ऑपरेशन दरम्यान उघड झालं. या सर्व प्रकाराबाबत झी 24 तासनं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद साधल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी या प्रकारात लक्ष घातलं. तात्काळ कारवाईचं पाऊल उचलत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षिस जाहीर केलंय. तसंच वरिष्ठ अधिका-यांना बीडला जाण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये दाखल झाले आणि रात्री अकरा वाजता याप्रकरणी कारवाई करत सानप हॉस्पिटलच्या डॉ. शिवाजी सानप, उषा जावळे आणि लता जोगदंड या तिघांना अटक करण्यात आलीए.

 

सुदाम मुंडेचं कृष्णकृत्य उजेडात आल्यावर पंधरा दिवसही होत नाहीत, तोच पुन्हा हा प्रकार घडलाय. कारवाई सुरू झाली असली तरी स्त्री भ्रूण हत्या थांबतील का? हा चर्चेचा विषय ठरलाय.