ऍस्पिरिनने टळतो कँसरचा धोका

दररोज एक ऍस्पिरिन खाल्यास कँसर, हृदयविकार तसंच रक्ताच्या गुठळ्या यांसारख्या रोगांपासून बचाव होतो. तीन वेगवेगळ्या अभ्यासांतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Updated: Mar 23, 2012, 06:46 PM IST

www.24taas.com, लंडन

दररोज एक ऍस्पिरिन खाल्यास कँसर, हृदयविकार तसंच रक्ताच्या गुठळ्या यांसारख्या रोगांपासून बचाव होतो. तीन वेगवेगळ्या अभ्यासांतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अर्थात, अजूनही शास्त्रज्ञांना यासंदर्भात १००% पुष्टी देणारा पुरावा मिळालेला नाही. तरी या गोळीमुळे पोटातून रक्त येण्यासारखे साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता आहे. हृदयविकारावरील औषध म्हणून बरेचजण ऍस्पिरिन गोळी घेतात.

यासंदर्भातील तीन नवे निष्कर्ष ‘द लांसेट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. यामध्ये असे लिहीले आहे की ऍस्पिरिनमुळे कँसरचा धोका कमी होतो. तसंच झालेला कँसर पसरत नाही. त्यामुळे कँसरमुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता तिपटीने कमी होते.  हा शोध लावणाऱ्या ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाच्या प्रोफेसर पीटर रॉथवेल आणि त्यांच्या मंडळाने असा दावा केला आहे की काही प्रकारचे कँसर, विशेषतः पोटाच्या कँसरचा धोका टाळण्यात उपयोगी पडतो.