KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'

KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 11:14 PM IST
KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है' title=
KKR reached in 2024 Final

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन अन् व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) शानदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने क्वालिफायर-1 सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह आता केकेआरने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर सनरायझर्स हैदराबादला निराश होण्याची गरज नाहीये. त्यांना आता दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. एलिमिनेटरमधील विजयी संघासोबत त्यांचा मुकाबला होईल.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या, पण केकेआरने 24 चेंडूत श्रेयसच्या पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 58 धावा केल्या आणि वेंकटेश अय्यरच्या 28 चेंडूत पाच चौकारांच्या जोरावर विजय मिळवला चार षटकारांच्या जोरावर 51 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर 13.4 षटकांत दोन गडी गमावून 164 धावा केल्या. त्यामुळे केकेआरने क्वालिफायर सामन्यात मोठा विजय मिळवला. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि टी नटराजन यानी प्रत्येकी एक विकेट घेतली. इतर कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला अपेक्षित अशी सुरूवात मिळाली नाही. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही सलामीवीर स्वतात बाद झाले. तर राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून घरली. नितेश रेड्डी आणि शाहबाद अहमद यांनी देखील खास कामगिरी केली नाही. पण क्लासेनने क्लास दाखवली अन् 32 धावा चोपल्या. त्यानंतर एकामागून एक विकेट्स पडल्या अन् मैदानावर पॅट कमिन्स एकाकी पडला. कमिन्सने अखेरच्या 4 ओव्हर खेळून काढल्या अन् संघाला 159 वर पोहोचवलं. हैदराबादला धावा कमी असल्याची जाणीव होती. मात्र, त्यांना केकेआरला रोखता आलं नाही.

हैदराबादविरुद्ध कोण?

राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो क्वालिफायर 2 मध्ये हैदराबादशी दोन हात करेल. तर पराभूत झालेल्या संघाचा प्रवास थांबणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.