ऑलिम्पिकमध्ये धावणार 'ब्लेड रनर'

दुर्दैम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरवर माणूस किती मोठी झेप घेवू शकतो हे दाखवून दिलंय दक्षिण आफ्रिकेचा अथलिट ऑस्कर पिस्टोरियसनं... दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करनं कृत्रिम पायांच्या मदतीनं ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्पप्न पूर्ण होणार आहे...

Updated: Jul 6, 2012, 01:21 PM IST

www.24taas.com,

 

दुर्दैम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरवर माणूस किती मोठी झेप घेवू शकतो हे दाखवून दिलंय दक्षिण आफ्रिकेचा अथलिट ऑस्कर पिस्टोरियसनं... दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करनं कृत्रिम पायांच्या मदतीनं ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्पप्न पूर्ण होणार आहे... अव्वल ऍथलिट्सला अवघड असणारी कामगिरी या अपंग अथलिटनं केलीय. आता दक्षिण आफ्रिकेच्या फोर इनटू फोर हंड्रेड मीटर रिले टीममध्ये तो दिसेल.

 

ऑस्कर पिस्टोरियस... दक्षिण आफ्रिकेच्या या  ब्लेड रनरनं चमत्कार केलाय. दोन्ही पायांनी अपंग असलेला ऑस्कर, कृत्रिम पायांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये धावताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फोर इनटू फोर हंड्रेड मिटर रिले टीमसोबत ऑस्कर लंडन ऑलिम्पिकमध्ये  धावणार आहे. ऑस्कर बालपणापासून दोन्ही पायांनी अपंग... अपंगत्वामुळे ऑस्कर चालू शकणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ऑस्करनं सर्वांचे अंदाज खोटे ठरवले. ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्वप्न त्यानं उराशी बारगळलं. हेच स्पप्न साकार करण्यासाठी जिगरबाज ऑस्करनं कठोर परिश्रम घेतलेत.  अपंगत्वही त्याला ध्येयापासून दूर करू शकलं नाही आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली. 400 मीटरमधील 45.07 सेकंद ही ऑस्करन दिलेली सर्वोत्तम वेळ तर अव्वल अथलिट्सला गाठणंही अवघडच. ऑस्करच्या कृत्रिम पायांवरूनही अनेकांनी आक्षेप घेतला. मात्र, आता सर्व अडथळ्यांवर त्यानं मात केलीय आता दोन्ही पायांनी अपंग असलेला ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस ऑलिम्पिकमध्ये धावून इतिहास रचणार आहे. अपंग असूनही ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणारा तो पहिलाच धावपटू ठरणार आहे. आणि त्याची ही झेप अनेकांनाही निश्चितच प्रेरणादायी ठरेल.