पोलीस आता कोर्टात, BCCIने १० कोटी बुडवले

नवी मुंबईतल्या आय़पीएल सामन्यांबाबत हायकोर्टानं बीसीसीआयला नोटीस बजावली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या १० कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Updated: Apr 2, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, मुंबई

नवी मुंबईतल्या आय़पीएल सामन्यांबाबत हायकोर्टानं बीसीसीआयला नोटीस बजावली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या १० कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

नवी मुंबईमधल्या डी. वाय. पाटील स्टेडियमला आयपीएल मॅचसाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. त्याचे २०१० आणि २०११चे एकूण १० कोटी रुपये बीसीसीआयने दिले नसल्याने पोलिसांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याबाबत आता ४ एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं, अशी नोटीस हायकोर्टाने बीसीसीआयला दिली आहे.

त्यामुळे आता बीसीसीआय आता यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्याचसोबत आयपीएलसारख्या एका मोठ्या लीग मॅचमध्ये अब्जो रूपयांची गुंतंवणूक केली जात असताना... सुरक्षा व्यवस्था हा भाग अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच  पोलिसांनी बीसीसीआय विरूद्ध याचिका दाखल केली आहे.