शेर-ए-बांग्लावर टीम इंडिया ढेर

सचिन सोबत आलेल्या रैनानेही ५१ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताचा स्कोर उभारण्यास मदत झाली. त्यानंतर आलेल्या धोनीने २१ रन करत टीमला २८९ रनपर्यंत पोहचवले. ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून भारताने बांग्लादेश समोर २९० रनचं आव्हान ठेवलं.

Updated: Mar 16, 2012, 09:51 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

शाकिब अल हसन आणि रहमान यांच्या तडाखेबंद फलंदाजीने बांग्लादेशने मीरपूरच्या वनडेमध्ये भारतावर पाच विकेट्सनी विजय मिळवला.

 

बांग्लादेशने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी २८९ धावांचे आव्हान ठेवलं. सचिनचे विश्वविक्रमी शंभरावे शतक तसंच विराट कोहलीच्या ६६ आणि सुरेश रैनाच्या ५१ धावांच्या जोरावर भारताने चांगली धावसंख्या गाठली. पण भारतीय गोलंदाजांनी सपशेल निराशा केली.

 

बांग्लादेशच्या सलामीवर इकबालने ७० धावा फटकावत संघाला दमदार सुरवात करुन दिली. याव्यतिरिक्त इस्लामने ५३ तर नासिर होसेनने ५४, अल हसनने ४९ आणि रहिमने नाबाद ४६ धावा काढल्या. बांग्लादेशच्या सर्व फलंदाजांनी जबाबदार खेळत करत भारताच्या पराभवात मोलाची कामगिरी बजावली. तर भारताच्या गोलंदाजांनी पुरती निराशा केली. पी.कुमारने तीन विकेट्स घेतल्या.

सचिन सोबत आलेल्या रैनानेही ५१ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताचा स्कोर उभारण्यास मदत झाली. त्यानंतर आलेल्या धोनीने २१ रन करत टीमला २८९ रनपर्यंत पोहचवले. ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून भारताने बांग्लादेश समोर २९० रनचं आव्हान ठेवलं.

 

सचिनने आज संपूर्ण देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने अखेर महाशतक करून दाखवलेच. महाशतकाचा रेकॉर्ड त्याला नेहमी हुलकावणी देत होता. मात्र आज बांग्लादेशसोबत झालेल्या मॅचमध्ये सचिनने त्याचे शतक पूर्ण केले. त्याने ११४ रन केले. तर त्यासोबत आलेला कोहलीने ६६ रन केले.

 

टॉस जिंकून प्रथम बॅटींगसाठी आलेल्या इंडियन टीमची सुरवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. गंभीर जो गेल्या मॅचचा हिरो ठरला होता, तो या मॅचमध्ये जास्त चमकदार कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे सुरवातीलाच विकेट गेल्याने टीमची सुरवात मात्र संथ झाली.

 

पण आज सगळ्यांचेच लक्ष सचिनच्या महाशतकाकडे लागून राहिलेलं होतं. त्यातच सचिनला आज लय सापडल्यामुळे तो विकेटवर चांगला जम बसल्यासारखा खेळत होता. आणि त्याने आपलं अर्धशतक देखील पूर्ण केलं.  आता तो आपलं शतक पूर्ण करून महाशतकांचा टप्पा गाठणार का? याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती.

 

सचिनने गेल्या वर्षभरात शतक केलेलं नसल्याने आज शतक करून शतकांचा वनवास संपवावा अशीच साऱ्यांची इच्छा होती. सचिनसोबत आलेला विराट कोहली हा देखील चांगलाच फॉर्मात आहे. आणि त्याने देखील अर्धशतक पूर्ण केले.

 

एशिया कपमध्ये भारताने टॉस जिंकला. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटींग घेतली. सचिन महाशतक आज करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. तसंच बांग्लादेश सोबत असणऱ्या थोड्या सोप्या मॅचमध्ये शतक करण्यासाठी सचिनही नक्कीच तयार असेल. भारतीय टीममध्ये आज दोन बदल करण्यात आले आहेत. रविंद्र जडेजा आणि अशोक डिंडा यांना बांग्लादेश विरूद्ध संधी देण्यात आली आहे.

 

इंडिया : 289/5 (ओव्हर 50.0)

बांग्लादेश : 0/0 (ओव्हर 0.0)

सचिन तेंडुलकर - 114 (147)