सवाई गंधर्व महोत्सवाचं साठीत पदार्पण...

डिसेंबर महिना जवळ आला की पुणेकरांना आणि तमाम कानसेनांना वेध लागतात ते सवाई गंधर्व महोत्सवाचे... आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी हा महोत्सव ११ ते १६ डिसेंबर दरम्यान सहा दिवस चालणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 27, 2012, 03:42 PM IST

www.24taas.com, पुणे
डिसेंबर महिना जवळ आला की पुणेकरांना आणि तमाम कानसेनांना वेध लागतात ते सवाई गंधर्व महोत्सवाचे... आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी हा महोत्सव ११ ते १६ डिसेंबर दरम्यान सहा दिवस चालणार आहे.
गायन, वादन आणि नृत्याचा एकात्मिक अविष्कार म्हणजे हा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव... यंदाचा महोत्सव रसिकांसाठी जुन्या आणि नव्या पिढीच्या कलाविष्काराची मेजवानी ठरणार आहे. प्रसिद्ध सनई वादक पंडित अनंत लाल यांची नातवंडं अश्विनी आणि संजीव शंकर, पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र राहुल शर्मा, पंडित उल्हास कशाळकर यांचे पुत्र समीहन कशाळकर, उस्ताद अमजद अली खाँ यांचे पुत्र अयान आणि अमान अली खाँ, पंडित राजन साजन मिश्रा यांचे पुत्र रितेश आणि रजनीश मिश्रा अशा कलाकारांची कलोपासना यावर्षी सवाईच्या व्यासपीठावर सादर होणार आहे.
याशिवाय पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि मालिनी राजूरकर हे दिग्गजही आपली कला सादर करणार आहेत.