औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा

औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले. शहराचा विस्तार झाला मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही. त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतेय. अरूंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झालीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 12, 2013, 09:36 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले. शहराचा विस्तार झाला मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही. त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतेय. अरूंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झालीय.
लाल सिग्नल असतानाही वेगात गाडी चालवणारे हे औरंगाबादकर..... त्यांच्यासाठी सिग्नलपेक्षा नेहमीच घाई महत्त्वाची..... झेब्रा क्रॉसिंगच्या पुढेच गाड्या उभ्या करायच्या... सिग्नल सुरू होण्याआधीच धूमस्टाईलनं गाड्या पळवायच्या.... ही सगळी बेशिस्त कमी की काय म्हणून रिक्षाचालकंही रस्त्यांवरच पार्किंग करतात. या बेशिस्त वाहतुकीमुळे औरंगाबादकर पुरते मेटाकुटीला आलेत.
गेल्या वर्षी फक्त औरंगाबादेत 180 हून जास्त नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय..बेशिस्त वाहनचालक आणि पोलिसांचं नसलेलं नियंत्रण यामुळेच असे प्रकार घडत असल्याचं औरंगाबादकरांचं म्हणणं आहे.

2012 मध्ये औरंगाबाद पोलिसांनी रस्ते नियमांचं उल्लंघन केल्याप्रकऱणी 1 कोटीहून अधिक दंड वसूल केला मात्र ही वसुली केवळ टार्गेट पूर्ण करण्यापुरतीच... वाहतूक कोंडीतून मार्ग काढायचा असेल तर सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. आणि त्याची सुरुवात होते ते सामान्य औरंगाबादकरापासून....