बाळासाहेबांनी `देह सोडला`... पण `तेज कायम`

आज बाळासाहेबांनी अखेरचा दुपारी ३.३० वा. अखेरचा श्वास घेतला. आणि त्याच्यानंतर उभ्या महाराष्ट्र शोककूल झाला.

Updated: Nov 18, 2012, 01:24 AM IST

www.24taas.com, मुंबई
आज बाळासाहेबांनी अखेरचा दुपारी ३.३० वा. अखेरचा श्वास घेतला. आणि त्याच्यानंतर उभ्या महाराष्ट्र शोककूल झाला. शिवसेनाप्रमुख याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उद्या शिवतीर्थावर पार्थिव ठेवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे.
मातोश्रीतल्या दुसऱ्या मजल्यावर पार्थिव बाळासाहेबांच्या हॉलमध्ये काचेच्या पेटीत पार्थिव भगव्या वस्त्रात लपेटलेलं पार्थिव शरीर कायम ठेवण्यात आलं आहे. पण तरीही या ढाण्या वाघाचं तेज कायम देह सोडून गेल्यावरही कायम आहे.
डोळ्यावर नेहमीचा गॉगल, बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरचं तेज कायम, आणि त्याच्या उजव्या बाजूला माँसाहेबांचा जुना फोटो. बाळासाहेबांच्या पार्थिवावर उद्या ५ वाजता. अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.