पाहा, तुमची मस्तकरेषा काय सांगतेय...

चिंताग्रस्त अवस्थेत तुमच्या कपाळावर उमटतात त्या आठ्या... मात्र, ज्या रेषा तुमच्या जन्मापासूनच तुमच्या कपाळावर स्पष्टपणे दिसून येतात त्या असतात तुमच्या मस्तकरेषा... तुमचं भाग्य सांगणाऱ्या!

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 30, 2013, 07:49 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चिंताग्रस्त अवस्थेत तुमच्या कपाळावर उमटतात त्या आठ्या... मात्र, ज्या रेषा तुमच्या जन्मापासूनच तुमच्या कपाळावर स्पष्टपणे दिसून येतात त्या असतात तुमच्या मस्तकरेषा... तुमचं भाग्य सांगणाऱ्या!
कशा वाचतात या मस्तकरेषा...
 मस्तकरेषा गुरूवरून निघत असेल तर तो तत्त्वज्ञ, लेखक, गाजलेले शिक्षक, प्राध्यापक अशांपैकी असतो.
 रेषेच्या सुरुवातीस एक रेषा गुरुवरून व दुसरी मंगळावरून येत असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात शैक्षणिक अडथळे येतात.
 रेषा बारीक नसून जाड व पसरट असेल तर आकलनशक्ती कमी असते.
 रेषा गुरुवरून दोन फाट्यांची असेल तर अनेक विषयांत गती असते. ही रेषा व आयुष्यरेषा प्रारंभी एकत्र असतील तर तो स्वतंत्र बुद्धीचा असतो.
 रेषा जर गुरुवरून निघून अंत:करण रेषेस जुळलेली असेल, तर त्याला कौटुंबिक काळजी फारशी नसते.
 मस्तकरेषा व आयुष्यरेषा प्रारंभी एकत्र असतील तर तो कर्तव्यदक्ष मुलगा, पती व पिता असतो. त्याच्याबद्दल सर्वांना आदर असतो.
 दोन रेषांऐवजी एकच असेल तर तो भावनाप्रधान असतो.
 रेषेतून एक फाटा निघून शनिवर जात असेल त्याला खूप नैराश्य येते.
 रेषेतून एक फाटा रविवर जात असेल तर त्याला व्यावसायिक यश मिळते. बुधावर जात असेल तर व्यापारात यश. रेषा जर बुधाकडे वळेल तर तो उद्योगधंदा, कारखानदारी यांत यश मिळवतो. व्यापार व पैसा हे त्याचे सर्वस्व असते. ही रेषा व भाग्यरेषा यांचा छेद शनिखाली असेल तर त्याला आर्थिक स्थैर्य येते.
 रविखाली असेल तर बुद्धिवैभवाने यश मिळवतो. रेषा जर मंगळावर जात असेल तर त्याची बुद्धी, स्मरणशक्ती टिकून राहते. तो योग्य प्रकारे खर्च करतो. त्याला कोणी फसवू शकत नाही. ही रेषा जर अचानक खाली वळून चंद्रावर गेली तर, त्याला कुटुंबापासून अलग रहावे लागते.
 ही रेषा रविपर्यंत येऊन मग खाली वळेल तर त्याला वारसाहक्काने इस्टेट मिळते. ही रेषा खूप उतरत गेली शिवाय शनिवर फुली असेल त्याला प्रचंड मानसिक ताण येतो.त्यामुळे मानसिक संतुलन ढासळू शकते. किंवा ऍनिमिया, ब्लडप्रेशर यांचा त्रास होतो. रेषा कमी लांबीची असेल तर तो अस्वस्थ व रागीट असू शकतो.
 मस्तकरेषा अजिबात नसून फक्त अंत:करणरेषा असेल तर तो फार हळवा असतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.