रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी

बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हल्ली बहिणींना भावाकडून काही स्पेशल गिफ्ट हवे असते. त्यामुळे सगळ्या बहिणी रक्षाबंधनची आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणीला खालील ३ गोष्टी जरुर द्यावा. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल.

Updated: Aug 17, 2016, 10:59 AM IST
रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी title=

मुंबई : बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हल्ली बहिणींना भावाकडून काही स्पेशल गिफ्ट हवे असते. त्यामुळे सगळ्या बहिणी रक्षाबंधनची आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणीला खालील ३ गोष्टी जरुर द्यावा. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल.

१. वस्त्र - प्रत्येक महिलेला नटायला आवडते. मनुस्मृतिनुसार, ज्या घरात पुरुष आपली माता, पत्नी अथवा बहिणीला चांगले वस्त्र देतो त्या घरात देवाचा वरदहस्त असतो. 

२. दागिने : वस्त्रांसोबतच महिलांना दागिने अतिशय प्रिय असतात. त्यामुळे बहिणीला एखादा दागिना भेट द्या. यामुळे लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहील.

३. नेहमी चांगले बोला - अनेक ग्रंथामध्ये तसेच पुराणामध्ये महिलेला मोठे महत्त्व दिलेय. त्यामुळे महिलांशी नेहमी सन्मानाने वागा. ज्या घरात स्त्रियांना सन्मानाने वागवले जात नाही त्या घरात देवाचा वास नसतो.