मंदिरात देवासमोर नारळ का फोडतात?

 देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. 

Updated: Jul 26, 2016, 03:46 PM IST
मंदिरात देवासमोर नारळ का फोडतात?  title=

मुंबई :  देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव आहे. प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्यात येत असे. ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला. 

त्यांनी विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ ह्याचे बलिदान लोकांना सुचविले. कारण नारळाला डोके, शेंडी, नाक, डोळे इ. आहेत. परंतु, बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिढकाव झाला पाहिजे. 

म्हणून ऋषींनी देवाच्या मूतीला सिंदूर (कुंकू) लावायला व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकावा करण्यास सांगितले. त्यामुळे रक्ताचा लाल रंगही येईल. अशा प्रकारे ऋषींनी मानवाला नर आणि पशूहत्येपासून वाचविले. शिवाय नारळ हे बाराही महिने सहज मिळणारे फळ असून ते दीघकाळ टिकणारेही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.