Maharashtra News

महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीचा भरवर्गात विनयभंग

महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीचा भरवर्गात विनयभंग

अलिबाग तालुक्यातील चौलमधील महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थीनीशी भरवर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणा-या शिक्षकाविरूदध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

रत्नागिरीच्या चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कार पळवली

रत्नागिरीच्या चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कार पळवली

सातारा-पुणे मार्गावर एक धक्कादाय प्रकार घडलाय. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत गाडी घेऊन प्रवाशांनीच पलायन केले. रत्नागिरीतील आंबेशेत येथील मुन्ना घोसाळे यांची स्विफ्ट डिझायर गाडी चोरट्यानी पळवून नेलीय. 

शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस

शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस

उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या यवतमाळच्या पुरड येथील विकास कुडमेथेंची सैन्य किट यवतमाळच्या बसस्थानकावर बेवारस आढळल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान शहीद जवानाचे साहित्य असे बेवारस आढळल्यानें संतापही व्यक्त होत आहे.

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार, सर्व आरोपी अटकेत

शहराजवळील साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोलपंप लुटण्यासाठी गोळीबार आणि पेट्रोलपंप मालकावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

जेवणात वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जुन ठरलेला असतो. अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं. याच वांग्याचं झाडं तुम्ही पाहिलं असेलच. मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्यांच झाड.

VIDEO : तलवारीनं हल्ला करणाऱ्या 'त्या' भाजप नेत्याला अटक होणार?

VIDEO : तलवारीनं हल्ला करणाऱ्या 'त्या' भाजप नेत्याला अटक होणार?

औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून भरदिवसा तलवार घेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. आरोपी हाफिज शेख हा भाजपचा अल्पसंख्यांक आघाडीचा शहराध्यक्ष आहे. सत्ताधारी पार्टीच्या नेत्याची ही गुंडगिरी निश्चितच धक्कादायक आहे.

भाजप नेत्याची आमदारकी रद्द

भाजप नेत्याची आमदारकी रद्द

गडचिरोलीचे भाजप आमदार डॉक्टर देवराव होळी यांची शासकीय सेवेत असताना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

नाशिक नाट्यगृहाच्या अवस्थेमुळे प्रशांत दामले भडकले

नाशिक नाट्यगृहाच्या अवस्थेमुळे प्रशांत दामले भडकले

नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नाट्यगृहात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे कलाकारांना इथे नाटकाचा प्रयोग करणं मुश्किल झालं आहे.

सिंधुताई सपकाळ संतप्त, आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार?

सिंधुताई सपकाळ संतप्त, आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार?

सिंधुताई सपकाळांनी एक्सप्रेस हायवेवरच्या बेदरकार वाहनचालकांविरोधात आवाज बुलंद केला.

आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले

आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले

आवक वाढल्याने सध्या भाज्यांचे दर गडगडले आहेत.. फळभाज्यांचे दर घसरले असले तरी पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाहुया सध्या नवी मुंबई मार्केटमध्ये भाज्यांचे दर काय आहेत.. 

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली

शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.

औरंगाबादमध्ये बाईक पार्किंगच्या वादावरून राडेबाजी

औरंगाबादमध्ये बाईक पार्किंगच्या वादावरून राडेबाजी

सकाळी दुचाकी बाजुला करण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरत पाच ते सहा जणांनी तरुणाला दुसऱ्या दिवशी गाठून तलवारीनेमारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्रिमुर्ती चौकात हा प्रकार घडला. भर दुपारी पाच ते सहा जण हातात तलवारी घेऊन पळत असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशीरा सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल.

बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधींचे शासकीय अनुदान लाटले

बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधींचे शासकीय अनुदान लाटले

जिल्हा उद्योग केंद्रात बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधींचे शासकीय अनुदान लाटले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

रत्नागिरीत शिवसेना स्वबळावर, पारदर्शकतेवरुन हल्लाबोल

रत्नागिरीत शिवसेना स्वबळावर, पारदर्शकतेवरुन हल्लाबोल

जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

राज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे

राज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे

राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.

मराठा आरक्षणाला हार्दिक पटेलचा पाठिंबा

मराठा आरक्षणाला हार्दिक पटेलचा पाठिंबा

गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी लढणारा हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी सगळयांनी एकत्र आलं पाहिजे. असं हार्दिक पटेलने म्हटलं आहे.

 पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

पिंपरीत कार्यकर्ता गोंधळात, म्हणतो कोणता झेंडा घेऊ हाती...

निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते. 

 पिंपरीत शिवसेनेला दिला भाजपने ८८-६४ चा फॉर्म्युला

पिंपरीत शिवसेनेला दिला भाजपने ८८-६४ चा फॉर्म्युला

अपेक्षे प्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये युतीचं घोडं जागा वाटपावर अडकलंच.... १२८ पैकी तब्बल ८८ जागांवर भाजपने दावा ठोकलाय तर शिवसेनेनं निम्म्या म्हणजेच ६४ जागा देण्याची तयारी ठेवलीय.

 पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

हरवलेल्या चिमुरडीला पोलिसांत सापडलं मायेचं छत्रं!

हरवलेल्या चिमुरडीला पोलिसांत सापडलं मायेचं छत्रं!

पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला. एका किडनॅप झालेल्या मुलीला जंग जंग पछाडत पोलिसांनी शोधलं आणि तेव्हापासून ही चिमुकली पोलिसांच्या मायेत अडकली... आता औरंगाबादचं जवाहरनगर पोलीस ठाणं म्हणजे या मुलीसाठी आपुलकीची, खेळण्याची जागा आहे... 

 व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'

व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'

पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय, औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला.