...म्हणून बिंद्राचे पदक हुकले

भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.

Updated: Aug 9, 2016, 10:56 AM IST
...म्हणून बिंद्राचे पदक हुकले title=

रिओ : भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.

यानंतर अभिनवचे कोच हाईंज रेनकमायर यांनी एका वृत्तप्रत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनवच्या पराजयाबाबत मोठा खुलासा केला. अभिनव याचे पदक हुकण्यामागे त्याची स्पेशल रायफल तुटणे हेही कारण असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोच हाईंज यांनी सांगितले की, अभिनवने ज्या टेबलावर रायफल ठेवली होती ते टेबल अचानक तुटले यामुळे रायफलचा पुढचा भाग तुटला. अभिनवसाठी खास ही रायफल बनवण्यात आली होती. या रायफलसोबत त्याने प्रॅक्टिसही केली होती. 

त्यामुळे अखेरच्या क्षणी स्टँडबायमध्ये ठेवलेल्या दुसऱ्या रायफलने अभिनवला खेळावे लागले. केवळ हेच कारण त्याच्या पराजयासाठी कारणीभूत आहे असे काही नाही. मात्र यामुळे त्याच्या खेळावर थोड्याफार प्रमाणात परिणाम झाला असावा. 

अवघ्या ०.१ गुणाच्या फरकाने त्याचे कांस्यपदक हुकले. नाहीतर कदाचित अभिनवला ऑलिम्पिकचा अखेर पदकानिशी करता आला असता.