सलमाननंतर आमीरचंही शाहरुखला आव्हान!

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड ‘धूम ३′ नक्की मोडेल, असा विश्वास मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं व्यक्त केलाय. सध्या धूम-३चा प्रोमो खूप गाजतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 16, 2013, 03:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड ‘धूम ३′ नक्की मोडेल, असा विश्वास मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं व्यक्त केलाय. सध्या धूम-३चा प्रोमो खूप गाजतोय.
आमीरचे फॅन्स त्याच्या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहतायेत. शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटानं चार वर्षापूर्वीचा आमीरच्या ‘थ्री इडियटस’चा सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड मोडला होता. त्यामुळं आता पुन्हा एकदा आमीर शाहरूखवर बाजी मारणार का, याबाबत उत्सुकता आहे.
‘धूम ३′ या चित्रपटात आमीर खान खलनायकाची निगेटीव्ह रोल करतोय. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून, यामध्ये अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा यांचीही भूमिका असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमीरनं म्हटलंय, की २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या थ्री इडियटस चित्रपटाचा रेकॉर्ड चार वर्षांनी मोडला आहे. आता धूम ३ पुन्हा एकदा कमाईच्या बाबतीत विक्रम करेल. त्याचाही विक्रम २०२०मध्ये आणखी कोणता तरी चित्रपट मोडेन.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.