ऐश्वर्या करणार मलाईकावर मात?

ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूड सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच कमबॅक करतेय आणि तेही आयटम नंबरच्या जलव्यासह...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 7, 2013, 11:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूड सुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लवकरच कमबॅक करतेय आणि तेही आयटम नंबरच्या जलव्यासह... संजय लिला भन्साळी यांच्या आगामी ‘रामलीला’ या सिनेमात ऐश्वर्याचा आयटम नंबर पाहायला मिळणार आहे.
‘बंटी और बबली’मधलं ‘कजरा रे... कजरा रे... तेरे काले काले नैना’ या गाण्यावर ठुमका लगावणारी किंवा ‘धूम-२’मध्ये ‘क्रेझी किया रे...’ म्हणताना डान्सचा जलवा दाखवणारी ऐश्वर्या आता आणखी एका आयटम साँगमध्ये दिसणार आहे. तसं पाहिलं तर ऐश्वर्याचे आयटम नंबर हातावर मोजण्याइतकेच... पण, आता मात्र ऐश्वर्या आपला आयटमचा नवा अंदाज दाखवण्यासाठी सज्ज झालीय.
संजय लिला भन्साळी यांच्या आगामी ‘रामलीला’ या सिनेमात ऐश्वर्याचा आयटम नंबर असणार आहे. ऐश्वर्या आणि संजय लिला भन्साळी यांची केमिस्ट्री चांगली जुळतेच. मग तो ‘हम दिल दे चुके सनम’ असो किंवा ‘गुजारिश’.... संजयचा ‘गुजारिश’ हा सिनेमाच तिचा प्रेग्नसी लिव्हवर जाण्याआधीचा शेवटचा सिनेमा ठरला कारण ‘हिरोईन’मध्ये तिला रिप्लेस केलं ते करीना कपूरने... त्यामुळे प्रेग्नसी लिव्हवर गेलेली ऐश्वर्या आयटमचा जलवा घेऊन ‘रामलीला’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय.

कतरिना, मल्लिका, प्रियांका यांच्याबरोबर तिच्या या आयटम नंबरची तुलना ही होणारचं... मात्र, त्यातही मलाईका अरोरा-खान सोबतची तिची तुलना ही जास्त महत्त्वाची ठरणार आहे. कारण ‘मम्माज’ झालेल्या मलाईका ‘मुन्नी बदनाम हुई’सारख्या हटके अदांनी आजही प्रेक्षक घायाळ होतो. त्यामुळे आता ‘मम्मा’ झाल्यानंतर ऐश्वर्याच्या या पडद्यावरच्या आयटम नंबरची मलाईकाशी तुलना होणारच... सो बेस्ट ऑफ लक ऐश्वर्या!
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.