शाहरूख खानच्या 'रईस'चे पहिले ट्रेलर होणार रिलीज

बॉलीवूड बादशाहा शाहरूख खानचा आगामी 'रईस' चित्रपटाचे पहिले ट्रेलर 7 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. तसेच शाहरूखान आपल्या हजारो चाहत्यांसोबत विडियो कॅन्फर्सच्या माध्यामातून संवाद साधणार आहे.

Updated: Nov 27, 2016, 01:40 PM IST
शाहरूख खानच्या 'रईस'चे पहिले ट्रेलर होणार रिलीज title=

नवी दिल्ली: बॉलीवूड बादशाहा शाहरूख खानचा आगामी 'रईस' चित्रपटाचे पहिले ट्रेलर 7 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. तसेच शाहरूखान आपल्या हजारो चाहत्यांसोबत विडियो कॅन्फर्सच्या माध्यामातून संवाद साधणार आहे.
 
आगामी रईस चित्रपटाला घेऊन शाहरूख खान खूप आनंदात आहे. चित्रपटाचे पहिले ट्रेलर देशभरातील 3500 स्क्रिनवर दाखवले जाणार आहे.
 
चित्रपटाच्या निर्मात्यानी सांगितले की, रईसचे ट्रेलर देशातील प्रत्येक शहरातील कानाकोपऱ्यातील चित्रपटगृहांपर्यंत पोहचवण्याचा माझा उद्देश आहे. हा पहिला चित्रपट असणार आहे की त्याचे ट्रेलर एकाच वेळी एवढ्या स्क्रिनवर दाखवले जाणार आहे.
   
शाहरूख खान विडियो कॅन्फर्सच्या माध्यामातून 9 राज्यातील दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, कोलकत्ता, जयपूर, पंजाब, इंदोर, आणि अहमदाबाद मधील हजोरो चाहत्यांसोबत बातचीत करणार आहेत.
   
27 जानेवारीला 'रईस' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटात शाहरूख खानसोबतच माहिरा खान, आणि नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
    
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया असून चित्रपटाची निर्मिती रितेश सिद्धवानी, तसेच फरहान अख्तरच्या एक्सेल इंटरटेन्मेंट आणि शाहरूख खान- गौरीच्या रेड चिली एंटरटेन्मेंट करत आहे.