अभिनेता सैफ अली खानविरोधात चार्जशीट दाखल

Last Updated: Friday, December 21, 2012 - 18:13

www.24taas.com, मुंबई
अभिनेता सैफ अली खानविरोधात हॉटेल ताजमधील मारामारीप्रकरणी चार्जशीट दाखल झाली आहे. दहा महिन्यांपूर्वी मुंबईत हॉटेल ताजमध्ये इक्बाल शर्मा आणि रामन पटेल यांच्यासोबत सैफचं भांडण झालं होतं.
कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सैफविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीला हॉटेल ताजमध्ये सैफ, करिना कपूर, मलायका अरोरा खान यांच्यासोबत सैफचे काही मित्र हजर होते.
यावेळी सैफ आणि इक्बाल शर्मा यांच्यात वाद झाला होता, त्यानंतर सैफने इक्बाल शर्मा यांच्या नाकावर ठोसा मारला असं शर्मा यांचं म्हणणं आहे. कलम ३२५ नुसार सैफविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

First Published: Friday, December 21, 2012 - 18:05
comments powered by Disqus