बॉलिवूडचं सर्वात महागडं गाणं ‘धूम-३’मधील ‘मलंग’!

आपल्या वेगवेगळ्या स्टाईल आणि लूकनं लोकांना आकर्षित करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा आगामी चित्रपट धूम-३मध्येही आमीरनं स्वत:च्या लूकमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. या चित्रपटातील ‘मलंग’ हे गाण बॉलिवूडमध्ये सर्वात महागडं गाणं म्हणून घोषित करण्यात आलंय. या गाण्याचा खर्च तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात गेलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 8, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या वेगवेगळ्या स्टाईल आणि लूकनं लोकांना आकर्षित करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा आगामी चित्रपट धूम-३मध्येही आमीरनं स्वत:च्या लूकमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. या चित्रपटातील ‘मलंग’ हे गाण बॉलिवूडमध्ये सर्वात महागडं गाणं म्हणून घोषित करण्यात आलंय. या गाण्याचा खर्च तब्बल ५ कोटी रुपयांच्या घरात गेलाय.
या गाण्यासाठी आमीर खाननं नवीन अवतार घेतलाय. तसंच या गाण्याच्या तयारीसाठी आमीरला तीन तास मेकअप रुममध्ये थांबावं लागलं होतं. मलंग या गाण्यात आमीरनं शरीरावर रंगकाम केलंय. पण हा कोणताही सामान्य रंग नाही. लॉस एंजेलिसचे प्रसिद्ध पेंटर एयरब्रश मेकअप आर्टिस्ट अॅडम टेनेमबॉय यांनी आमीरच्या शरीरावर रंगकाम केलं आणि विशेष म्हणजे या गाण्यासाठी सौंदर्यप्रसाधनं रंगाचा वापर करण्यात आला आहे.
हे गाणं तयार करण्यासाठी सुमारे पाच कोटीचा खर्च करण्यात आला आहे. गाण्यामध्ये आमीर आणि कतरिना रिंगवर खेळ करताना दिसणार आहे. रिंगवर पराक्रम दाखवण्यासाठी या दोन्ही अभिनेत्यानी प्रचंड मेहनत घेतली आहे. एवढंच नाही तर या गाण्यात एका चौकटीत २००नृत्य कलाकार एकत्र दिसणार आहे. या सर्व गोष्टींमुळं ‘मलंग’ हे गाणं खूप चर्चेत आलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ