विद्या होणार `आई`?

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री विद्या बालन ही दक्ष नागरिक म्हणून मतदान केंद्रावर मतदान करताना दिसली होती. मतदान करण्यासाठी आपण `आयफा पुरस्कार`साठी जाणं टाळलं, असं विद्यानं म्हटलं असलं तरी विद्याचं `आयफा पुरस्कार सोहळा` टाळण्यामागे वेगळंच कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 26, 2014, 07:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री विद्या बालन ही दक्ष नागरिक म्हणून मतदान केंद्रावर मतदान करताना दिसली होती. मतदान करण्यासाठी आपण `आयफा पुरस्कार`साठी जाणं टाळलं, असं विद्यानं म्हटलं असलं तरी विद्याचं `आयफा पुरस्कार सोहळा` टाळण्यामागे वेगळंच कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
आयफा मल्टी सिटी प्रमोशनल टूरमध्ये भारतीय सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्या बालन हिची निवड झाली होती. `विद्यानं अगोदर यासाठी आपला होकार कळवला होता. परंतु, शेवटच्या क्षणी तिनं आपला विचार बदलला. यामागचं कारण मात्र तिनं सांगितलेलं नाही. त्यामुळे प्रियांका चोप्रा हिची निवड केल्याचं` आयफा सूत्रांकडून समजतंय.
आयफा पुरस्कार सोहळा 23 ते 26 एप्रिल रोजी अमेरिकेच्या थांपा बे मध्ये सध्या सुरू आहे. यावेळी, विद्या हॉलिवूड अभिनेता केव्हीन स्पेसी याच्यासोबत आयफा मास्टर क्लास पॅनलचा भाग बनण्याचीही संधी मिळाली होती. पण, विद्यानं तीही हुकवलीय.
यामागचं कारण म्हणजे सध्या विद्या `आई` बनणार असल्याचं सांगण्यात येतंय... आणि त्याचमुळे तीनं ही संधी हुकवलीय, असं म्हटलं जातंय.
डिसेंबर 2012 मध्ये विद्यानं यूटीव्ही आणि वाल्ड डिजनीचे एमडी सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.