`कामसूत्र 3 डी` चित्रपटाला भीती सेन्सॉर बोर्डाची

रूपेश पाल निर्मित `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा सध्या अडथळ्यांची शर्यत करतोय, कारण सुरूवातीला शर्लिनच्या जागेवर रूपेश पाल करिना कपूरला घेणार होते, करिनाला स्टोरीही आवडली पण तिला चित्रपटाच्या `कामसूत्र 3 डी` नावावर आक्षेप होता.

Updated: Jan 15, 2014, 12:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रूपेश पाल निर्मित `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा सध्या अडथळ्यांची शर्यत करतोय, कारण सुरूवातीला शर्लिनच्या जागेवर रूपेश पाल करिना कपूरला घेणार होते, करिनाला स्टोरीही आवडली पण तिला चित्रपटाच्या `कामसूत्र 3 डी` नावावर आक्षेप होता.
गुलजार साहेबांनी या चित्रपटाची गाणी लिहावीत, असंही रूपेश पालला वाटलं होतं. मात्र गुलजार साहेबांनाही `कामसूत्र 3 डी` नावाच्या मुद्यावर होकार दिला नाही.
खरा अडथळा आणखी पुढे आहे. कारण रूपेश पालला भारतीय सेन्सॉर बोर्डाची भीती वाटतेय. शर्लिन चोप्राचे बोल्ड सीनमुळे निर्माता घाबरलाय.
भारतीय सेन्सॉरला कलेची कदर नसल्याचंही रूपेश पाल यांनी म्हटलं आहे. `कामसूत्र 3 डी` या चित्रपटात आणखी एक खास म्हणजे, हा सिनेमात अॅक्शन सीनही आहेत.
शर्लिन चोप्राचा नवा चित्रपट `कामसूत्र 3 डी` हा सिनेमा क्रिश ३ आणि चेन्नई एक्स्प्रेसला मागे टाकणार आहे, असा दावा निर्मात रूपेश पाल यांनी केला आहे.
सिंगापूर सारख्या देशात एका भारतीय चित्रपटाला ४० हजार सिंगापूर डॉलरमध्ये खरेदी करण्यात आलं. `कामसूत्र 3 डी`लाही सिंगापूरमध्ये ७५ हजार सिंगापूर डॉलरमध्ये खरेदी करण्यात आलंय, असं रूपेश पाल यांनी म्हटलंय.
या चित्रपटात अॅक्शन सीन तर आहेत, पण शर्लिन चोपडाच्या काही बोल्ड दृश्यांमुळे रूपेश पाल काहीसे घाबरलेले दिसले. मला भारतीय सेन्सॉर बोर्डाची भिती आहे.
भारतीय सेन्सॉर बोर्डाला कलेची कदर नाही, माझा चित्रपट परदेशात हातोहात घेण्यात आला, तर माझ्या देशातील लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे, अशी माझी इच्छा असल्याचंही रूपेश पालने म्हटलं आहे. यावेळी चित्रपटाचा प्रोमो लॉन्च करण्यात आला पण, शर्लिन चोप्रा मात्र अनुपस्थित होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.