अल्पवयीन मुलीवर बलात्कार, `केआरके`चा `बापूं`वर वार!

आसाराम बापूंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अभिनेता कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने आसाराम बापूंची टर्र उडवत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 22, 2013, 04:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आसाराम बापूंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अभिनेता कमाल राशिद खान ऊर्फ केआरके याने आसाराम बापूंची टर्र उडवत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.
आसाराम बापूंवर पुन्हा एकदा बलात्काराचा आरोप केला गेल्यामुळे वादग्रस्त संत आसाराम बापू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारावर आसाराम बापूंनी वादग्रस्त विधान केलं होतं. ती मुलगी जर त्यांना भाऊ म्हणाली असती, तर त्या मुलांनी बलात्कार केला नसता, अशी टिपण्णी आसाराम बापूंनी केली होती. अभिनेता केआरके याने हाच धागा पकडत ट्विटरवर आसाराम बापूंची खिल्ली उडवली आहे.
“बघा, आसाराम बापूंनी पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ती मुलगी तर आसारामांना बापू म्हणजे वडील म्हणत होती, तरीही त्यांनी तिच्यावर बलात्कार केलाच.” असं केआरकेने ट्विट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.