सेक्सी महिलांच्या यादीत अभिनेत्री कुनिस टॉपवर

एफएचएमच्या वर्ष २०१३च्या सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीमध्ये हॉलीवूडची अभिनेत्री मिला कुनिस सध्या सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.

Updated: May 7, 2013, 11:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
एफएचएमच्या वर्ष २०१३च्या सर्वाधिक सेक्सी महिलांच्या यादीमध्ये हॉलीवूडची अभिनेत्री मिला कुनिस सध्या सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. तर पॉप गायिका रिहाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेबसाईट `कान्टेक्टम्यूजिक डॉट कॉम`च्या मते, एफएचएमचे डेप्युटी एडिटर डैन जूड यांनी सांगितले.
मिला कुनिससाठी हे वर्ष फारच चांगलं आहे. कुनिसने सर्वाधिक कमाई करीत हॉलीवूडच्या ‘टेड’ या हास्य सिनेमात काम केलं होतं. त्यामुळे हॉलीवूडमध्ये तिला बरीच मागणी आहे. इतकचं नाही तर ती, फारच नैसर्गिकरित्या मोहक आहे. ती स्वत:वर हसण्यासही अजिबात घाबरत नाही.
एफएचएमच्या दहा सेक्सी महिलांची यादी पुढील प्रमाणे : मिला कुनिस, रिहाना, हेलेन फ्लानागन , मिशेल कीगन, केली ब्रुक, केली क्यूको, पिक्सी लोट, केट अप्टन, चेरिल कोल आणि जार्जिया साल्पा देखील यामध्ये सहभागी आहेत.