गोल गोल घनचक्कर आणि विद्या बालन

गेल्याच वर्षी प्रदर्शीत झालेल्या कहानी या चित्रपटानंतर आपण जवळजवळ १५ महिने मोठ्या पडद्यापासून वंचित राहिल्याचे विद्या बालन म्हणतेय. घमचक्कर या नवीन प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटातून विद्या बालन पुन्हा येतेय आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला.

Updated: Jun 28, 2013, 04:45 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
गेल्याच वर्षी प्रदर्शीत झालेल्या कहानी या चित्रपटानंतर आपण जवळजवळ १५ महिने मोठ्या पडद्यापासून वंचित राहिल्याचे विद्या बालन म्हणतेय. घमचक्कर या नवीन प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटातून विद्या बालन पुन्हा येतेय आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला.

कहानीनंतर ती भलेही कोणत्या चित्रपटात दिसली नसली तरीही १५ महिन्यांत आपण अनेक कामे केल्याचे तिने म्हंटल आहे. कान महोत्सव, घनचक्कर चित्रपटाची तयारी अशी अनेक काम केल्याचे तिने म्हटले आहे. निर्देशक राजकुमार गुप्ता यांच्या घनचक्कर या चित्रपटात विद्या बालन आणि इमरान हाशमी आपल्याला एकत्र दिसणार आहेत.
यामध्ये इमरानने विद्याच्या पतिची भूमिका बजावली आहे आणि आश्चर्य म्हणजे फूल रोमांसने भरलेल्या या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि विद्या बालनचे पति सिद्धार्थ राय कपूर यांनी केली आहे. या चित्रपटात विद्याने एका पंजाबी महिलेची भूमिका बजावली आहे. ही भूमिका करणं माझ्यासाठी सोप नव्हतं असंही तिने म्हंटल आहे. यामागच्या मेहनतीचे फळ हे चित्रपट पाहिल्यानंतर मिळाल्याचे सांगून आपला आनंदही तिने व्यक्त केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.