विद्या बालनचं 'सरप्राईज पॅकेज'!

अभिनेत्री विद्या बालन हीदेखील ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमाच्या यशासाठी उत्सुक होती... विद्या का ‘वन्स अपॉन’ची वाहवा करतेय हा प्रश्न अनेकांना पडला होता... आज हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 15, 2013, 01:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री विद्या बालन हीदेखील ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमाच्या यशासाठी उत्सुक होती... विद्या का ‘वन्स अपॉन’ची वाहवा करतेय हा प्रश्न अनेकांना पडला होता... आज हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ या सिनेमात विद्या बालन गेस्ट रोलमध्ये दिसणार आहे. विद्याच्या चाहत्यांसाठी हे एक सरप्राईज पॅकेजच असेल.
एकता कपूरच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारा’ आणि यूटीव्हीच्या `चेन्नई एक्सप्रेस` मध्ये वाद झाला होता. यामुळे किंवा विद्या बालन तिचा पती सिद्धार्थ कपूरमुळे एकता पासून दूर झाली अशा वावड्या उठल्या होत्या. परंतु, विद्या आता ‘वन्स अपॉन’मध्ये गेस्ट रोलमध्ये दिसण्यात येणार असल्याचं उघड झालं आणि या अफवांना ब्रेक मिळाला. विद्या बालन ही या सिनेमात एक ‘कॅमिओ’ करतेय.

विद्याचा पती सिद्धार्थ रॉय-कपूर हा चेन्नई-एक्सप्रेसच्या निर्मात्यांपैकी एक आहे आणि हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवतोय. एकताला आपल्या सिनेमा दरम्यान इतर कोणताही सिनेमा रिलीज होऊ नये यासाठी काळजी घेत होती पण यूटीव्ही चेन्नई एक्सप्रेस ईदच्या मुहूर्तावर रिलीज केला. याचमुळे विद्या आणि एकतामध्येही थोडा वाद झाला होता.
या वादाचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नातही काही जण होते परंतू ‘वन्स अपॉन’ रिलीज झाल्यानंतर आणि त्यात विद्याला पाहिल्यानंतर त्यांच्या अपेक्षा मात्र अपुऱ्याच राहणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.