अनिल कपूर `कर्ण` आणि जॅकी श्रॉफ `दुर्योधन`!

अभिनेता निर्माता अनिल कपूर याने `महाभारत` या ३ डी सिनेमात कर्णासाठी आपला आवाज देऊ केला आहे. आता दुर्योधनासाठी आपला मित्र जॅकी श्रॉफ याने आवाज द्यावा, अशी त्याची इच्छा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2013, 01:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता निर्माता अनिल कपूर याने `महाभारत` या ३ डी सिनेमात कर्णासाठी आपला आवाज देऊ केला आहे. आता दुर्योधनासाठी आपला मित्र जॅकी श्रॉफ याने आवाज द्यावा, अशी त्याची इच्छा आहे.

महाभारतावर येणाऱ्या ३ डी सिनेमात अनिल कपूरला अर्जुन किंवा कर्ण या दोनपैकी एका पात्रासाठी आवाज देण्यासाठी पर्याय विचारले होते. अनिल कपूरने कर्णासाठी आपला आवाज देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपला मित्र जॅकी श्रॉफ याने दुर्योधनासाठी आवाज द्यावा, असा प्रयत्न तो करत आहे.
निर्माते जयंती लाल गडा म्हणाले, “आनिल आणि मी दुर्योधन आणि कर्णाच्या मैत्रीबद्दल बोलत होतो. यावेळी बोलताना अनिल कपूरने आपला मित्र अभिनेता जॅकी श्रॉफने दुर्योधनाची भूमिका करावी, अशी इच्छा व्यक्त केली”
महाभारत सिनेमात मेगास्टार अमिताभ बच्चन भीष्मांसाठी, विद्या बालन द्रौपदीसाठी, सनी देओल भीमासाठी, अजय देवगण अर्जुनासाठी तर मनोज वाजपेयी युधिष्ठिरासाठी आवाज देणर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.