‘कॉमेडी नाईट’च्या सेटवर सोनाली-जोयाची हाणामारी

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, May 7, 2014 - 08:59

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्रींमधल्या कॅट फाईटची एव्हाना प्रेक्षकांनाही सवय झालीय. पण, हीच ‘कॅट फाईट’ हाणामारीपर्यंत पोहचली तर... असंच घडलंय ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’च्या सेटवर... ‘द एक्सपोज’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या दोन अभिनेत्रींमधील ‘कॅट फाईट’ कानशिलात लगावण्यापर्यंत पोहचली.
त्याचं झालं असं की सोनाली राऊत आणि झोया अफरोज आपल्या पहिल्याच सिनेमाचं म्हणजेच ‘द एक्सपोज’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’च्या सेटवर दाखल झाल्या होत्या. यावेळी गायक-अभिनेता हिमेश रेशमियाही त्यांच्यासोबत उपस्थित होता. सोनाली-झोयामध्ये मेकअप व्हॅनमध्येच त्यांच्यामध्ये थोडा वाद झाला आणि पाहता पाहताच झोयानं सोनालीच्या एक कानाखाली ठेऊन दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये अगोदरपासूनच कॅट फाईट सुरू होती. मेक अप व्हॅनमध्ये जशी सोनाली-झोया एकमेकींसमोर आल्या तेव्हा अगोदरच्या भांडणाचा मुद्दा काढून सोनालीनं झोया ‘इथं तरी नीट वाग नाहीतर बदडून काढीन’ असं म्हटलं. हे ऐकताच झोयानं आजूबाजूला न पाहता सोनालीच्या कानशिलात लगावून दिली. दोघींमधली ही हाणामारी वाढण्याआधीच हिमेशनं मध्यस्थी केली आणि दोघींना एकमेकींपासून वेगळं केलं.

झोया अफोरज ही मिस इंडिया 2013 ची सेकंड रनरअप ठरली होती. झोया आणि सोनाली पहिल्यांदाच ‘द एक्सपोझ’मधून प्रेक्षकांसमोर येतायत. या सिनेमात हिमेश रेशमिया, यो यो हनी सिंग आणि इरफान यांनीही मुख्य भूमिका निभावल्यात. हिमेशनं या सिनेमाचं दिग्दर्शनातही हातभार लावलाय. हा सिनेमा येत्या 23 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014 - 08:59
comments powered by Disqus