`आयपीएल म्हणजे भारतीय क्रिकेटमधील विद्या बालन!`

भारताचे माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांनी बीसीसीआयवर जोरदार का केली आहे. आयपीएलबद्दल बीसीसीआयची टीका करताना आयपीएल म्हणजे क्रिकेटमधील विद्या बालन असल्याचं त्यांनी म्हटलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 8, 2013, 04:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचे माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांनी बीसीसीआयवर जोरदार का केली आहे. आयपीएलबद्दल बीसीसीआयची टीका करताना आयपीएल म्हणजे क्रिकेटमधील विद्या बालन असल्याचं त्यांनी म्हटलं.
एका कार्यक्रमात माजी क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांनी आयपीएलवर टीका करताना आयपीएल म्हणजे भारतीय क्रिकेटमधील विद्या बालन असल्याचं बेदी यांनी म्हटलं आहे. “विद्या बालन ज्याप्रमाणे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट असं म्हणाली होती, त्याप्रमाणेच आयपीएल मह्णजे फक्त एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट बनलं आहे. आयपीएल हा आपला वारसा नसून कसोटी क्रिकेट हाच आपला वारसा आहे,” असं बेदी म्हणाले. आयपीएलमधील क्रिकेट हे माझ्यासाठी फारसं महत्वाचं नाही, असंही बेदी म्हणाले.
सचिन तेंडुलकरला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांवरही बिषनसिंग बेदींनी टीका केली आहे. सचिनच्या निवृत्तीबद्दल स्वतः सचिनच निर्णय घेईल. इतरांना त्याला सल्ला देण्याचा अधिकार नाही, असं बेदी म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.