टी-२० : ६ विकेट राखून इंग्लंडची भारतावर मात

टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान आज वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच रंगतेय. टॉस जिंकून इंग्लंडनं पहिल्यांदा भारताला बॅटींगची संधी दिली. यावेळी भारतानं इंग्लंडपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 22, 2012, 10:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
टी-२० मॅच सीरिजच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं तब्बल सहा विकेट राखून भारतावर पुन्हा एकदा मात केलीय. त्यामुळे टी २० सीरिज १-१ नं बरोबरीत आहे. भारतानं ठेवलेल्या १७८ रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडनं हा सामना आपल्या सहजपणे आपल्या खिशात घातला.
टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान वानखेडेवर दुसरी टी-२० मॅच रंगली. टॉस जिंकून इंग्लंडनं पहिल्यांदा भारताला बॅटींगची संधी दिली. यावेळी भारतानं इंग्लंडपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवलंय. सुरेश रैनाच्या नाबाद ३५ रन्स, विराट कोहली, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे प्रत्येकी ३८ रन्स आणि रोहित शर्माच्या २४ रन्सच्या जोरावर भारतानं निर्धारित २० ओव्हर्समध्ये ८ बाद १७७ रन्स ठोकले.
सलामीवीर अजिंक्य रहाणे ३ रन्स, युवराजसिंगनं ४ रन्स, गौतम गंभीरनं १७ तर रोहित शर्मानं २४ रन्स दिले. विराट कोहलीनं २० बॉल्समध्ये ७ चौकार ठोकून ३८ रन्स दिले. त्याला इंग्लंडच्या मिकरनं टिपलं. ल्यूक राइटनं दोघांना टीपलं तर, ब्रेसनन, ड्रेनब्रेच, मिकर व ट्रेडवेल यांनी पत्येकी एक-एक बळी टिपला. भारताने आजच्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या जागी रोहित शर्माचा समावेश केला होता.