टीम इंडिया ढेपाळली, इंग्लंडची सुरवात जाम भारी

टीम इंडियाला 316 रन्सवर पहिल्या इनिंगमध्ये रोखल्यानंतर इंग्लंडनं आश्वासक सुरुवात केली आहे.

Updated: Dec 6, 2012, 08:36 PM IST

www.24taas.com, मुंबई
टीम इंडियाला 316 रन्सवर पहिल्या इनिंगमध्ये रोखल्यानंतर इंग्लंडनं आश्वासक सुरुवात केली आहे. ऍलिस्टर कूक आणि निक कॉम्पटन या इंग्लंडच्या ओपनिंग जोडीला आऊट करण्यात भारतीय टीमला अपयश आलं आहे. बॅट्समननी निराशा केल्यानंतर भारतीय बॉलर्ससमोर आता इंग्लिश टीमला झटपट आऊट करण्याचं आव्हान आहे.
कोलकाता टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी बॉलर्सना शानदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडिया पहिल्य़ा इनिंगमध्ये 316 रन्सवर ऑलआऊट झाली. सचिन तेंडुलकर, कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीरच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताला तीनशेचा टप्पा पार करता आला.
भारतीय बॅट्समननी या मॅचमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. दरम्यान, टेस्टच्या दुस-या दिवशीच्या सुरवातीलाच झहीर खान आणि ईशांत शर्मा झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर धोनीनं प्रग्य़ान ओझाच्या साथीनं थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
त्यानं झुंजार हाफ सेंच्युरीही झळकावली. मात्र, हाफ सेंच्युरी झळकावल्यार धोनी आऊट झाला आणि भारताची पहिली इनिंग 316 रन्सवर आटोपली. मॉन्टी पानेसरने चार तर जेम्स अँडरसनने तीन विकेट्स घेतल्या. स्टिव्हन फिन आणि ग्रॅमी स्वानने प्रत्येकी एकेक विकेट घेतली.