टीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००

भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 24, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, हैदराबाद
भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.
दिवसअखेर फ्रॅकलिन (२५) आणि वॅन वॅक (१) खेळत आहेत. सलामीवीर ब्रॅडन मॅक्युलम (२२), आणि विल्यमसन (३२) यांना ओझाने बाद केले तर मार्टिन गुप्टिल (२) आणि कर्णधार रॉस टेलर (२) आणि फिन यांना अश्विनने बाद केले. शॉर्ट लेगला विराट कोहलीने मॅक्युलम, गुप्टिल आणि टेलरचे जबरदस्त झेल पकडले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हैदराबादमधील पहिल्या टेस्टमध्ये आज दुसऱ्या दिवशी चहापानापूर्वी भारताचा पहिला डाव ४३८ धावांवर संपला. चेतेश्वर पुजारा, धोनी आणि कोहली यांच्या धमाकेदार खेळामुळेच भारताला चारशेचा टप्पा ओलांडता आला. चेतेश्वर पुजाराने केलेल्या १५९ धावांचा यात मोलाचा वाटा आहे. स्पिनर अश्विनने शेवटच्या टप्प्यात ३७ धावांची चमकदार कामगिरी केली. भारताने १३४.३ षटकात सर्वबाद ४३८ धावा केल्या.
आज सकाळी आकाशात मळभ असल्याने खेळ उशीरा सुरु झाला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार धोनी या कालच्या नाबाद खेळाडूंनी आज चांगली सुरुवात करुन दिली. ३०७ धावसंख्येपासून सुरूवात झाली असता त्यांनी ३८८ पर्यंत धावसंख्या नेली. पुजारा १५९ धावांवर बाद झाला. त्याला जतिन पटेलने झेलबाद केले. पुजाराने ३०६ बॉल्समध्ये १९ फोर आणि १ सिक्सर लगावली. धोनीही 73 धावांवर बाद झाला. पटेलनेच त्या ची विकेट घेतली. धोनी बाद झाला त्यांवेळी भारताने 411 धावा केल्या होत्या .
त्यांनंतर झहीर खान शून्यवर, प्रग्यान ओझा आणि उमेश यादव दोघेही ४-४ धावा करून तंबूत परतले. भारताने शेवटच्या ५१ धावा काढताना ५ फलंदाज गमवले. त्याझमुळे 500 धावांचा टप्पा गाठण्यातत टीम इंडिया यशस्वी होऊ शकली नाही. न्यूझीलंडकडून फिरकी गोलंदाज जतिन पटेलने १०० धावात ४ बळी टिपले. तर, ट्रेन्ट बोल्टने ९३ धावांत ३ गडी टिपले.