टीम इंडियाचं कोच व्हायचयं मला- अझहर

भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनवर मॅच फिक्सिंग प्रकरणी लादण्यात आलेली आजीवन बंदी अन्यायकारक असल्याचा निर्णय आंध्र प्रदेश कोर्टाने दिला आहे.

Updated: Nov 8, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, हैद्राबाद

भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनवर मॅच फिक्सिंग प्रकरणी लादण्यात आलेली आजीवन बंदी अन्यायकारक असल्याचा निर्णय आंध्र प्रदेश कोर्टाने दिला आहे.
त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपलं मत अझहरने व्यक्त केलं. 'आज मला खूप आनंद होत आहे. उशीरा का होईना पण मला कोर्टाने न्याय दिला आहे. BCCI वर मी कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. परत खेळता तर येणार नाही. मात्र कोचसाठी मी नक्कीच उत्सुक आहे. आणि त्यामुळेच कोच पदासाठी विचार केल्यास मी त्यासाठी तयार असेन.' असं अझहरने आपली कोच पदासाठीची दावेदारी जाहीर केली आहे.
मोहम्मद अझहरूद्दीन मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अझहरूद्दीनवर 2000 साली आजीवन क्रिकेट न खेळण्याची बंदी लादली होती.

या बंदीविरोधात अझहरूद्दीने आंध्र प्रदेश हाय कोर्टात आव्हान दिलं होतं. त्याच्यावर लादण्यात आलेली बंदी हायकोर्टाने उठवली असल्याने अझहरूद्दीनला फार मोठा दिलासा मिळाला आहे.