‘कांदिवली क्रीडा संकुल’ आता ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’!

सचिन तेंडुलकरचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून गौरव करण्यात आलाय. कांदिवली क्रीडा संकुलाला ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’ असं नाव देण्यात आलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 11, 2013, 06:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सचिन तेंडुलकरचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून गौरव करण्यात आलाय. कांदिवली क्रीडा संकुलाला ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’ असं नाव देण्यात आलं.
एमसीएच्या आज झालेल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शरद पवारांपासून ते मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणं टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटर्सही या सोहळ्याला हजर होते.
सचिनचा मित्रपरिवार, मुंबईच्या टीमचे सदस्यांनीही यावेळी सचिनला सलाम केला. सचिन तेंडुलकरनही मुंबई क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद दिले. आता १४ नोव्हेंबरला सचिनच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन होईल. त्याचवेळेला बीसीसीआयकडूनही सचिनचा सन्मान करण्यात येईल. ही टेस्ट मॅच संपल्यानंतर काही दिवसांनी एमसीएतर्फे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
मॅचदरम्यान सचिनची एकाग्रता भंगणार नाही, याची काळजी घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं एमसीए उपाध्यक्ष रवी सावंत यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.