रेकॉर्डब्रेक मायकल... एका वर्षात चार डबल सेन्चुरी!

ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कनं ऍडलेड टेस्टमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. क्लार्कनं एका वर्षात चार डबल सेंच्युरीज झळकावण्याचा रेकॉर्ड केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 22, 2012, 05:56 PM IST

www.24taas.com, ऍडलेड, द. आफ्रिका
ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कनं ऍडलेड टेस्टमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. क्लार्कनं एका वर्षात चार डबल सेंच्युरीज झळकावण्याचा रेकॉर्ड केलाय.
याअगोदर ऑस्ट्रेलियाच्याच सर डॉन ब्रॅडमन आणि रिकी पॉन्टिगनं एका वर्षात तीन डबल सेंच्युरीज ठोकल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये नॉटआऊट २२४ रन्स काढत क्लार्कनं या विक्रमाला गवसणी घातली. त्याचप्रमाणे पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला येत पहिल्याच दिवशी डबल सेंच्युरी झळकावण्याचा विक्रमही त्यानं केलाय. याआधी पाकिस्तानच्या जावेद मियाँदादच्या नावावर हा विक्रम होता.
क्लार्कनं ३ जानेवारी २०१२ मध्ये भारताविरुद्ध नॉटआऊट ३२९ रन्सची इनिंग खेळली आणि या वर्षातील पहिली डबल सेंच्युरी ठोकली होती. त्यानंतर २४ जानेवारी २०१२ मध्ये त्यानं भारताविरुद्धच २१० रन्स करत दुसरी डबल सेंच्युरी ठोकली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्यानं नॉटआऊट २५९ रन्सची इनिंग खेळत तिसरी डबल सेंच्युरी झळकावली आणि आता आफ्रिकेविरुद्घच्या दुसऱ्या टेस्टमध्ये २२४ रन्सची नॉटआऊट इनिंग खेळत त्यानं विक्रमी चौथी डबल सेंच्युरी ठोकली.