‘स्टीव्ह वॉ’नं केली ‘दादा’ची स्तूती

काही दिवसांपूर्वी टीका करणारा ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं भारताचा माजी कप्तान सौरव गांगुलीवर आता स्तुतिसुमनं उधळतोय. ‘सौरव गांगुलीनंच भारतीय टीममध्ये विश्वास निर्माण केला’ या शब्दात त्यानं दादाची स्तुती केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 7, 2013, 03:13 PM IST

www.24tass.com , झी मीडिया, कोलकाता
काही दिवसांपूर्वी टीका करणारा ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं भारताचा माजी कप्तान सौरव गांगुलीवर आता स्तुतिसुमनं उधळतोय. ‘सौरव गांगुलीनंच भारतीय टीममध्ये विश्वास निर्माण केला’ या शब्दात त्यानं दादाची स्तुती केलीय.
कोलकाताच्या बैरकपूर इथं कुष्ठरोगानं ग्रस्त असलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी आलेल्या स्टीव्हनं भारताचा माजी कप्तानची स्तुती करत त्याला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून संबोधलं.
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोणीसोबत सौरव गांगुलीची तुलना करण्यासंदर्भात विचारलं असता स्टीव्ह म्हणाला कोलकाता आणि तुम्ही सगळे जाणता की, सौरव गांगुली चांगला कप्तान होता. सौरवनं भारतीय टीमला शिकवलं, त्यानं टीमला मजबूत बनवलं. धोणी आणि गांगुली दोघं वेगवेगळ्या पद्धतीचे कप्तान ठरले. दोघांनीही आपआपली भूमिका चांगल्या पद्धतीनं सांभाळली, असंही स्टीव्ह म्हणाला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात २००वी टेस्ट मॅच खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनू शकतो. याबद्दल विचारलं असता स्टीव्ह वॉ म्हणाला की, ही खूप मोठं काम आहे. हा रेकॉर्ड तोडणं खूप कठिण असेल. तर युवा ऑस्ट्रेलिया टीमला मजबूत बनण्यासाठी आणखी काही वेळ लागेल असं सध्या अॅशेज मालिकेत ०-२नं मागे असलेल्या ऑस्ट्रेलिया टीमबाबत बोलतांना वॉ म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.