महिलेची छेडछाड, ल्यूक पॉमर्सबॅचला अटक

आयपीएलमधील वादांची मालिका काही शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑसी क्रिकेटर ल्युक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: May 18, 2012, 11:30 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

 

आयपीएलमधील वादांची मालिका काही शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा  ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

ल्यूक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची केल्याचा तक्रार दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.विकेटकीपर असणा-या पॉमर्सबॅचने आयपीएलमध्ये याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

 

राजधानी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात थांबलेल्या या महिलेने व तिच्या भावी पतीने बंगळुरुचा खेळाडू ल्यूक पॉमर्सबॅच याला आपल्या खोलीत बोलावले होते. त्यानंतर महिलेने आरोप केला आहे की, या खेळाडूने माझ्याशी गैरवर्तन करुन अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. याला जेव्हा माझ्या भावी पतीने विरोध केला तेव्हा त्या खेळाडूने त्यालाही मारहाण केली. तक्रार करणारी महिला आणि तिचा भावी पती एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचे या महिलेने म्हटले आहे.

 

व्हिडिओ पाहा

[jwplayer mediaid="103397"]