पहा कधी मिळणार बारावीचा निकाल

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

Updated: May 30, 2013, 11:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यापासून आजपासूनच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. मात्र तुमच्या निकालाची प्रत ही ६ जून २०१३ला मिळणार आहे.
बारावीचा राज्यातील निकाल ७९.९५ टक्के लागला आहे. तर राज्यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८५.८८ टक्के इतका लागला आहे.
बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यात ८४.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ७६.६२ मुलं बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.