चेक वटला नाही तर...

तुम्हाला मिळालेला चेक वटला नाही किंवा तुम्ही दुसऱ्याला दिलेला चेक बाऊन झाला तर तुमचे काही खरे नाही. चेकचे लफडे आता महागात पडणार आहे. बॅंक आता तुमच्या खात्यावरच कायमची काट मारण्याची शक्यता अधिक आहे. कारण चार ते पाच वेळा काही कारणांनी चेक वटला नाही तर खाते बंद करून तुमचे बॅंकेचे दरवाजे कायमचे बंद होतील. त्यामुळे तुम्ही अधिक सावधनता बाळगली पाहिजे.

Updated: Apr 10, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

तुम्हाला मिळालेला चेक वटला नाही किंवा तुम्ही दुसऱ्याला दिलेला चेक  बाऊन झाला तर तुमचे काही खरे नाही. चेकचे लफडे आता महागात पडणार आहे. बॅंक आता तुमच्या खात्यावरच कायमची काट मारण्याची शक्यता अधिक  आहे. कारण  चार ते पाच वेळा काही कारणांनी चेक वटला नाही तर खाते बंद करून तुमचे बॅंकेचे दरवाजे कायमचे बंद होतील. त्यामुळे तुम्ही अधिक सावधनता बाळगली पाहिजे.

तुम्ही दिलेला चेक वारंवार बाऊन्स होत असेल  अशा खातेदारांना एक नोटीस पाठवून याची कल्पना देण्यात येणार आहे. त्यानंतरही चेक बाऊन्स झाल्यास ते खाते बंद करण्याची कारवाई होणार आहे. दरम्यान  त्या खात्यातील शिल्लक रक्कम ड्राफ्टद्वारे पाठवण्याचीही तरतूद आहे. अधिकाधिक ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधेचा वापर करावा, अशी बँकांची अपेक्षा आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाण्याच्या मते, चेक वारंवार बाऊन्स होत असेल तर ते खाते बंद करण्याची तरतूद आहे.

बँक ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अशा खात्यांवर बँकेची पाळत आहे.चेक बाऊन्स होणाऱ्या खात्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे खातेदार आणि एक कोटीपेक्षा कमी रकमेचे खातेदार असे गट पाडण्यात आले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिका-यानेही याच आशयाचे मत व्यक्त केले. आता बॅंकाचे एकमत होऊ लागले आहे. त्यामुळे चेक वटला नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना आली असेल. याबाबत खातेदाराला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.