पुण्यावर विषारी संकट

गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात शंभरपेक्षा जास्त घोणस सापडल्यायत. आतापर्यंत २२ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यायत. त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.

Updated: Nov 26, 2011, 12:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे 

 

सध्या पुण्यावर विषारी संकट ओढवलंय. विषारी साप अशी ओळख असलेल्या घोणसचा पुण्यात वावर वाढलाय. पुण्यातल्या शहरी भागातून सर्पमित्रांनी गेल्या पंधरा दिवसांत शंभर साप जंगलात सोडलेत.

घोणसचे डोळे मोठ्ठे असतात आणि अंगावर काळे ठिपके असतात. सर्वाधिक विषारी समजल्या जाणाऱ्या सापांपैकी घोणस हा एक प्रकार आहे. हा साप मनुष्यवस्तीजवळच्या झुडपांमध्ये आढळतो. पुणेकरांना या घोणसपासून सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा घोणसचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे या काळात घोणस सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या पुण्यामध्ये अशा घोणस सापांचं ठिकठिकाणी दर्शन घडतंय.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात शंभरपेक्षा जास्त घोणस सापडल्यायत. आतापर्यंत २२  जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यायत. त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी पुढील काळजी घ्या-

 

रात्री बाहेर पडताना सावध रहा

 

परिसरात काळोख असेल बॅटरी घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नका

 

बूट किंवा गमबूट घालून बाहेर जा

 

तुमच्या परिसरातल्या झुडपांची नीट मशागत करा

 

सर्पदंश झालाच तर तात्काळ डॉक्टरकडे जा

 

एखादी घोणस आढळली, तर तिला मारु नका

 

घोणस आढळताच तात्काळ सर्पमित्रांना माहिती द्या.  सर्पमित्रांसाठी ९८९०७४४५३९ , ९८८१८४८२८७ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधू शकता

 

याशिवाय घराबाहेर कचरा जमा होऊ देऊ नका. कच-यामुळे उंदीर जमा होतात. आणि ही घोणस जास्त प्रमाणात उंदीर खाते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवा... सध्या घोणस सापांचं प्रमाण वाढल्यानं पुणेकरांनी खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक झालंय.