ब्रँड, शाहरूख आणि वाद

बुधवारी वानखेडे स्टेडियमवर जो प्रकार घडला त्यामुळे बॉलीवूडचा किंग खान पुन्हा एका चर्चेत आला. पण यावेळी चर्चा जरा वेगळी होती. रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणारा बादशाह वेगळ्याच रुपात पहायला मिळाला.

Updated: May 18, 2012, 11:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

वानखेडेच्या वादाचा किंग खानला बसणार का फटका ?

वादामुळे ब्रँड व्हॅल्यू वाढणार की घटणार ?

किंग खानच्या साम्राज्याला लागलीय उतरती कळा ?

ब्रँड, शाहरुख आणि वाद

 

बुधवारी वानखेडे स्टेडियमवर जो प्रकार घडला त्यामुळे बॉलीवूडचा किंग खान पुन्हा एका चर्चेत आला. पण यावेळी चर्चा जरा वेगळी होती. रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणारा बादशाह वेगळ्याच रुपात पहायला मिळाला. आणि त्यामुळेच आता त्याला पुढचे पाच वर्ष वानखेडेवर पाऊल ठेवता येणार नाही.

 

तारीख : १६ मे २०१२

वार : बुधवार

ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई

 

 

 

रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणा-या  शाहरुखचं हे रुप पाहून त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. किंग खानने वानखेडे स्टेडियमवर सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. क्रिकेट ग्राऊंडवर जाण्याचा प्रयत्न शाहरुखने केला.. पण त्याला रोखण्याचा प्रयत्न करणा-या स्टेडियमवरच्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर तो धावून गेला.. त्यानं धक्काबूक्कीही केली. त्याच्या तोंडातून शिव्यांचा भडीमार होत होता. ही घटना घडली तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी तिथं उपस्थित होत...त्यांनी शाहरुखला समजावण्याचा प्रयत्न केला...पण तो ऐकायच्या मूडमध्ये नव्हता...त्याने स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं...या प्रकारानंतर एमसीएनं शाहरुख विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. एमसीएने कठोर भूमिका घेतल्यानंतर शाहरुख आणखीच भडकला आणि त्याने सगळा दोष एमसीएच्या माथी मारला..

 

घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याचा प्रश्नचं येत नसल्याचं शाहरुखने स्पष्ट केल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळणार यात शंका नव्हती....शाहरुख प्रकरणावर एमसीएने शुक्रवारी तातडीची बैठक घेतली आणि पुढील पाच वर्षासाठी शाहरुखला वानखेडे स्टेडियमचे दरवाजे बंद करण्याचा महत्वापूर्ण  निर्णय घेतला...शाहरुख हा आयपीएलच्या कोकात्ता नाईट रायडर टीमचा मालक आहे...पण  त्याला मालक म्हणून तर नाहीच नाही पण क्रिकेटप्रेमी म्हणूनही  स्टेडियममध्ये पाय ठेवता  येणार नाही. शाहरुखवर बंदी घालत अशा घटना भविष्यात घडू नये असा संदेशचं  MCA नं दिला आहे. वानखेडे स्टेडियमवर  शाहरुखनं घातलेल्या गोंधळ आणि त्यानंतर निर्मण झालेल्य़ा या  सगळ्या प्रकारामुळे क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीय...

 

पण क्रिकेट प्रमाणेच बॉलीवूड आणि जाहिरात क्षेत्रातही   या प्रकरणीची मोठी चर्चा सुरु झालीय... कारण किंग खान हा अनेक  उत्पादनाच्या जाहिरातीत पहायला मिळतोय. शाहरुख जसा बॉलीवूडचा बेतजा बादशाह आहे तसाच तो एडवर्ल्डमध्येही अव्वल आहे...पेनापासून ते कार पर्यंत आणि टूथ पेस्ट पासून ते घड्याळापर्यंत सगळ्याच प्रकारच्या जाहिरातीत किंग खान छोट्या पडद्यावर पहायला मिळतोय...पण त्याच्या  या वादाचा ब्रँड व्हॅल्यूवर तर काही परिणाम होणार नाही ना अशा शंका आता व्यक्त केली जात आहे. किंग खानने बॉलीवूडमध्ये आपलं  वेगळ  स्थान निर्माण केलं आहे...त्याच्या प्रत्येक सिनेमाला गर्दी करणारा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे...आणि त्यामुळेचं बॉलीवूडमध्ये त्याचा दबदबा  आहे... गेल्या काही वर्षात बॉलीवूडमध्ये  मिळालेलं यश आणि पैशामुळेच शाहरुख खान आज आयपीएलच्या एका टीमचा मालक बनला आहे.....

 

बॉलीवूडमधल्या आपल्य़ा स्टारडमचा त्याने जाहिरात क्षेत्रातही पुरेपूर वापर करुन घेतला आहे. आणि त्यामुळेच तो कारपासून  टुथपेस्टच्या जाहिरातीत  पहायला मिळतोय....जाहिरात हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम असून विविध वस्तूंच  उत्पादन करणा-या कंपन्यांकडून या माध्यमाचा पद्धतशीरपणे   वापर केला जातोय़..जाहिरात क्षेत्रातील उलाढालीचा आकडा सतत