विळखा रेव्हचा....

जूहूच्या ओकवूड हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीचा रंगात आलेला खेळ पोलिसांच्या छाप्यामुळे उध्वस्त झालाय... कालपर्यंत वेशीबाहेरचा धिंगाणा आता मध्यवस्तीत सुरु झालाय.. बॉलिवूड आयपीएल आणि ड्रग तस्करांच्या कनेक्शनमुळे रेव्ह पार्टीचा रंग बेधुंदीत मिसळुन गेला होता..

Updated: May 22, 2012, 12:02 AM IST

 www.24taas.com, मुंबई

 

महानगरीत खुलेआम होतायत रेव्ह पार्ट्या

पुन्हा सक्रिय झालंय ड्रग माफियांचं नेटवर्क

नशेच्या विळख्यात अडकतेय तरुणाई..

छापा मारुनही कसे सुटतायत लक्ष्मीपुत्र  ?

विळखा रेव्हचा...  

 

जूहूच्या ओकवूड हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीचा रंगात आलेला खेळ पोलिसांच्या छाप्यामुळे उध्वस्त झालाय... कालपर्यंत वेशीबाहेरचा धिंगाणा आता मध्यवस्तीत सुरु झालाय.. बॉलिवूड आयपीएल आणि ड्रग तस्करांच्या कनेक्शनमुळे रेव्ह पार्टीचा रंग बेधुंदीत मिसळुन गेला होता.. आणि आता या पांढरपेशाचा चेहरा जगासमोर उघड झाल्यावर आम्ही त्या गावचे नव्हेच अशी भाषा सुरु झालीय. मुंबईत एकीकडे रविवारचा मुड  एन्जॉय करत असताना दुसरीकडे त्याच मुंबईच्या जुहूत एका हॉटेलमध्ये सुरु होता धिंगाणा...  मुखवट्याच्या चेह-याआड दडलेला सभ्यतेचा मुखवटा बेधुंद होऊन नाचत होता.. काणठळ्या बसवणारे संगीत, अंधाराला चिरत जाणारा रंगीबेरंगी प्रकाशाची किरणे.. आणि सोबतीला नशेचा कैफ चढवणारी अंमली पदार्थाची लय़लूट.. बाहेरच्या श्रमजीवी जगाचा विसर पडलेली लक्ष्मीपुत्रांच्या धेंडाचा हा असा रेव्ह पार्टीचा धिंगाणा सुरु होता.. पण त्याचवेळी याच टिप मिळालेल्या मुंबई पोलिसांचा छापा पडला आणि त्या अंधारात सभ्यतेच्या मुखवटे गळून पडले...

 

जुहू येथील  ओकवूड ह़ॉटेलमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा मारला अन पोलिसांनी 100 पेक्षा जास्त मुला मुलीना ताब्यात घेतलं.. या पार्टीत अनेक विदेशी मुलीचाही समावेश होता.. पण या सर्वाची ज्यावेळी ओळखपरेड सुरु झाली त्यावेळी समोर आले अनेक नामाकिंत चेहरे.. रेव्ह पार्टीचे आयपीएलपासून बॉलीवुडपर्यतचे कडवं वास्तव.. सांगितीक कैफ अशा या पार्टीचं स्वरुप दिसलं ते नशेची रंगीन दुनियेसारखेच.. या पार्टीत नशेबाजाकडून 110 ग्रॅंम कोकन, मॅंड्रेक्स, एमडीएमए , एक्ससीच्या गोळ्या आणि चरसही जप्त करण्यात आलंय.. रेव्ह पार्ट्यांचे आयोजन हे पुर्वी शांत आणि निवांत अशा ठिकाणी व्हायचे. मात्र आता पोलिसांची दिशाभुल करण्यासाठी पुन्हा एकदा ड्रग तस्करांनी महानगरांचीच निवड केल्याचं उघड झालय.. आणि यासाठी पुन्हा एकदा सोशल नेटवर्कीग साईटसच वापर करण्यात आला होता.. याची निमंत्रणपत्रिकाही फेसबूकवरुन फिरत होती. या रविवारच्या सूर्योदयापासून आपण एकत्र भेटण्याचे डिझायनर हिप्पीजस, युनायटेड बीटस रेकॉर्डस. युएसए यानी ठरवलय. आपण सारे एकत्र येऊया,आणि एका वेगळ्या उंचीवर जाऊया.. कृपया यापासून पळू नका.. कारण पळण हा मोह आहे, वास्तव नाही. आणि म्हणूनच एकत्र येऊया आणि एक नवी शक्ती अनुभवा. मुंबईत जुहूच्या ओकवूड हॉटेलमधल्या रेव्ह पार्टीप्रकरणी हॉटेलचा डायरेक्टर विषय हांडा याला अटक करण्यात आली आहे.

 

हांडा यानंच ही पार्टी आयोजित केल्याचं उघड झाल्यानं एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आलीय. हांडानं रेव्ह पार्टीचं इन्व्हीटेशन फेसबूकवरून पाठवल्याचंही चौकशीत निष्पन्न झालंय. या पार्टीत राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे आयपीएलचे खेळाडूही असल्याचं समोर आलं होते... पुणे वॉरियर्सच्या राहुल शर्मानं आणि व्हेन पार्नेलने आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय.. तर आपण वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याचा दावा शिल्पा आणि तिचा पती अपूर्व अग्निहोत्रीने केलाय. सारवासारव, चेहरा लपवणे, मी त्या गावाचाच नव्हेच अशी भाषा आता सुरु झालीय, मात्र या रेव्ह पार्टीत बॉलिवूड आणि आयपीएलचा  संगम पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आजपर्यतं महानगरांपासून पळणारे सभ्यतेचे मुखवटे वापरणारे आता थेट महानगरीमध्येच रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करु लागलेयत.. छापा मारला म्हणून स्वताची पाठ थोपटत बसायचं कि, या रेव्ह पार्ट्या आता महानगरातही खुलेआम सुरुच झाल्यायत याचा विचार पो