RTI कार्यकर्त्याचा पोलिसांकडून मानसिक छळ

मुंबई पोलीस एका आरटीआई कार्यकर्त्यांचा मानसिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिल्डर लॉबीचं सत्य जगासमोर आणणाऱ्या संजय खेमका यांना मालाड पोलीस त्रास देत असल्याचा आरोप या आरटीआई कार्यकर्त्योनी केला आहे.

Updated: Feb 2, 2012, 06:19 PM IST

दिनेश मौर्या, www.24taas.com, मुंबई
 
मुंबई पोलीस एका आरटीआई कार्यकर्त्यांचा मानसिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिल्डर लॉबीचं सत्य जगासमोर आणणाऱ्या संजय खेमका यांना मालाड पोलीस त्रास देत असल्याचा आरोप या आरटीआई कार्यकर्त्योनी केला आहे. मात्र पोलीसांनी हे आरोप खोटे असल्याच दावा केला आहे.
 
‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ म्हणजेच  सज्जनांच्या रक्षणांसाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी सदैव तत्पर हे म्हटलं तर मुंबई पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. पण वास्तवात मुंबई पोलीस त्याउलट काम करताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांचा हा चेहरा आरटीआय एक्टीविस्ट संजय खेमका यांनी केलेल्या आरोपांमुळे समोर आला आहे.
 
बिल्डर लॉबीचा गैरकारभार आरटीआयच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते संजय खेमका यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन कॉल्स येऊ लागले. या संदर्भात मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर पोलीस तपासाच्या नावावर संजय खेमका यांनाच त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
मालाड पोलीस एफआयआरमध्ये ‘एचडीआयएल’ बिल्डरचं नाव टाकत नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते संजय खेमका यांनी केला आहे. मालाड पोलीस मानसिक छळ करत असल्याचा आरोपही खेमका यांनी केला आहे. संजय खेमका यांचे आरोप पोलिसांनी मात्र फेटाळले आहेत.
 
कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांना एफआयआर दाखल करावी लागल्याने या प्रकरणी तपासाचा अहवाल पोलिसांना ८ फेब्रुवारीला  उच्च न्यायालयात दाखल करायचा आहे. आधीच देशभरात आरटीआय कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होत असताना संजय खेमका यांनी हे गंभीर आरोप केलेत. त्याची दखल वेळीच घेतली जावी, अशी अपेक्षा आहे.

Tags: