स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी म्हातारपणी बेघर!

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांची वारंवार उपेक्षा होत असल्याचं समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 6, 2013, 04:42 PM IST

www.24taas.com, पंकज दळवी, मुंबई
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांची वारंवार उपेक्षा होत असल्याचं समोर आलंय. असंच अंधेरीतील एक उदाहरण आता उजेडात आलंय. स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला ऐन वृद्धापकाळात रस्त्यावर आणण्याचं काम पालिका आणि पोलिसांनी केलंय. 'झी २४ तास'चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...
मंगला दिघे गेल्या ५६ वर्षांपासून अंधेरी इथल्या घरात राहतायत. ८६ वर्षांच्या या वृद्धेला सामानासकट बाहेर काढण्याचा निर्दयीपणा मुंबई महापालिकेनं केलाय. महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी मंगला यांना रस्त्यावर आणलं. मंगला दिघे या स्वातंत्र्यसैनिक अनंत दिघे यांच्या पत्नी आहेत.

अंधेरी पश्चिममधल्या टाटा कम्पाऊन्ड इथल्या इष्टकृपा या चाळीत दिघे राहतात. ही जागा पालिकेची असून ११ कुटुंब इथे अनेक वर्षांपासून राहतात. मात्र, तरीसुद्धा महापालिकेनं स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीवरच कारवाईचा बडगा उगारला, असा प्रश्न दिघे कुटुंबीयांना पडलाय. पालिकेनं कायदेशीर कागदपत्रांद्वारे ही जमीन पुनर्विकासासाठी इथल्या रहिवाशांना मालकी तत्त्वावर दिलीय. तरीसुद्धा ही कारवाई का? असा प्रश्न दिघे कुंटुबीय विचार आहेत.