www.24taas.com, वॉशिंग्टन
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला न्यूयॉर्क इमिग्रेशननं चौकशीसाठी दोन तास ताब्यात घेतल्याची घटना समोर आलीय. शाहरूख अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलाय. मात्र येलला जाण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली.
विशेष म्हणजे इतरांना काही मिनिटांतच सोडण्यात आलं. शाहरूखला मात्र दोन तास थांबवण्यात आलं. या चौकशीबाबत शाहरुखनं नाराजी व्यक्त केलीय. तसंच येल युनिव्हर्सिटीला घडलेल्या प्रकाराबाबत कळल्यानंतर त्यांनीही इमिग्रेशन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही शाहरुखला 2009मध्ये न्यूयॉर्क विमानतळावर चौकशीसाठी रोखण्यात आलं होतं. या घटनेचे भारतात तीव्र पडसाद उमटले होते. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतात आयपीएल पाचचा सिझन रंगात आला असताना नवा वाद शाहरूख याच्यामुळे निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. राजस्थान सरकाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी केली आहे. ही बंदी १२ वर्षांपासून सुरू आहे. या बंदीचे शाहरूखने उल्लंघन केले आहे. याबाबतची दृश्ये दूरचित्रवाणीवरूनही दाखविण्यात आली आहेत. धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शाहरूखने याचे धुम्रपान बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्याविरोधात न्यायालयात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनाही दोषी धरण्यात आले आहे. क्रिकेट सामन्याच्यावेळी पोलिसांनी तपासणी करण्याबाबत बेजबाबदारपणा दाखवला आहे. स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी सर्वांची तपासणी होते. तसेच कोणताही ज्वलनशील वस्तू नेण्यावर बंदी असते. मग शाहरूख याने सिगरेट कशी ओढली. त्याची तपासणी केली असती तर सिगरेट जप्त करण्यात आली असती. हे काम पोलिसांनी केलेले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="82341"]