दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Updated: May 29, 2012, 12:45 PM IST

www.24taas.com, सोलापूर 

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

सोलापुरात पत्रकारांशी बोलताना लक्ष्मराव ढोबले यांनी राज्यात दुष्काळ एवढा गंभीर नसून माध्यमांनीच त्याला मोठं स्वरुप प्राप्त करून दिलंय, असे तारे तोडले. १९७२ च्या दुष्काळाची राज्यातील सध्याच्या परिस्थितीसोबत तुलना होत असताना ढोबळे यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडालीय. सरकार आणि मंत्री दुष्काळाबाबत किती उदासीन आहे, हेच यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं.

मात्र, दुष्काळ गंभीर नसल्याची वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्यान ढोबळेंवर विरोधक चांगलेच बरसलेत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि निलम गो-हे यांनी या विषयावर झी 24 तासशी बोलताना ढोंबळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यात दुष्काळाची स्थिती नाही मग राहुल गांधी तसच शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा कशासाठी केला? असा सवाल उपस्थित केला जातोय. तसंच मुख्यमंत्री केंद्राकडे मदत मागण्यासाठी का गेले? असे अनेक प्रश्न विरोधकांनी यावेळी उपस्थित केले आहेत.