महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील `बीग फाईटस्`

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालंय. महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.. पाहुयात, दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 5, 2014, 04:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालंय. महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. यातील दुसऱ्या टप्प्यात १९ मतदार संघांचा समावेश आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, पुणे, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघाचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे.

पाहुयात, दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती...
हिंगोली लोकसभा मतदारसंघ
सुभाष वानखेडे, शिवसेना विरूद्ध सूर्यकांता पाटील (शक्यता) राष्ट्रवादी विरूद्ध राजीव सातव (शक्यता) काँग्रेस
नांदेड लोकसभा मतदारसंघ
डी. बी. पाटील, भाजप विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही) काँग्रेस
शिरूर लोकसभा मतदारसंघ
शिवाजीराव आढळराव, शिवसेना विरूद्ध देवदत्त निकम, राष्ट्रवादी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
दिलीप गांधी, भाजप विरूद्ध राजीव राजळे,राष्ट्रवादी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
धनंजय महाडिक,राष्ट्रवादी विरूद्ध संजय मंडलिक(शक्यता) शिवसेना
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
राजू शेट्टी, स्वा. शेतकरी सं. विरूद्ध कलाप्पा आवाडे (शक्यता) काँग्रेस विरूद्ध जयंत पाटील (शक्यता) राष्ट्रवादी
सांगली लोकसभा मतदारसंघ
संजयकाका पाटील, भाजप विरूद्ध प्रतीक पाटील (शक्यता) काँग्रेस
बारामती लोकसभा मतदारसंघ
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी विरूद्ध महादेव जानकर, महायुती
सातारा लोकसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी विरुद्ध रिपाइं (उमेदवार निश्चित नाही)
माढा लोकसभा मतदारसंघ
विजयसिंह मोहिते, राष्ट्रवादी विरूद्ध प्रतापसिंह मोहिते(शक्यता) विरुद्ध सदाभाऊ खोत महायुती
पुणे लोकसभा मतदारसंघ
(उमेदवार निश्चित नाही) काँग्रेस विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही), भाजप
शिर्डी लोकसभा मतदारसंघ
भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही) , शिवसेना
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ
पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही) , महायुती
बीड लोकसभा मतदारसंघ
गोपीनाथ मुंडे, भाजप विरूद्ध नंदू माधव, आप विरूद्ध सुरेश धस, राष्ट्रवादी
परभणी लोकसभा मतदारसंघ
संजय जाधव,शिवसेना विरूद्ध विजय भांबळे, राष्ट्रवादी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
विनायक राऊत, शिवसेना विरूद्ध निलेश राणे (शक्यता) काँग्रेस

दुसऱ्या टप्प्यात अधिसूचना जारी करण्याची तारीख आहे १९ मार्च तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल २६ मार्च... या टप्प्यातील इच्छुक उमेद्वारांच्या अर्जांची छाननी २७ मार्चपर्यंत होईल तसंच २९ मार्चपर्यंत या टप्प्यातील उमेद्वारांना अर्ज मागे घेता येऊ शकतील. १७ एप्रिलमध्ये या टप्प्यातील मतदार आपली मतं नोंदवतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.